मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस !

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात २५-३० कोटी रुपये वाटले, असा आरोप ‘दैनिक सामना’तील एका लेखामध्ये केल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

नितीन गडकरी यांच्या प्रचारात फडणवीस नाईलाजाने उतरले, एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात पैसे वाटले, तसेच अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी एकनाथ शिंदे यांच्या यंत्रणेने विशेष प्रयत्न केले, असे आरोप संजय राऊत यांनी २६ मे या दिवशीच्या लेखामध्ये केले आहेत. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या नोटिसीमध्ये संजय राऊत यांनी क्षमा न मागितल्यास फौजदारी आणि दिवाणी कारवाई करू, अशी चेतावणी दिली आहे.