सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त कोटी कोटी प्रणाम !

अध्यात्माच्या मार्गाने जीवन जगणार्‍या जिवांसाठी ज्ञानगुरु, धर्मगुरु आणि मोक्षगुरु असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा उद्घोष करणारे राष्ट्रगुरु आहेत. समस्त प्राणीमात्रांचे कल्याण करण्यासाठी ते विविध मार्गांनी आणि व्यापकरित्या प्रयत्नरत आहेत. जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून ब्रह्मर्षींनी त्यांच्या अवतारत्वाची ओळख करून दिली असून त्यांच्याविषयी संतांनीही गौरवोद्गार काढले आहेत. त्यांनी विश्वकल्याणार्थ आरंभलेल्या व्यापक कार्याप्रती त्यांच्या चरणी जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी थोडीच आहे. अशा या विभूतीच्या चरणी कोटी कोटी वंदन !