३ गुरु रथात विराजमान झाल्यावर रथातील चैतन्यात आणि ब्रह्मोत्सवातील चैतन्यामुळे ३ गुरूंमधील चैतन्यात पुष्कळ वाढ होणे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त साजरा करण्यात आलेल्या ‘ब्रह्मोत्सव’ संदर्भातील संशोधन !

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हे तीनही गुरु ब्रह्मोत्सवातील रथात विराजमान झाल्यानंतर रथातील चैतन्यात उत्तरोत्तर पुष्कळ प्रमाणात वाढ होणे

श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांच्या उत्तराधिकारी श्री महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हे तीनही गुरु रथात विराजमान झाल्यावर त्यांच्यातील दैवी ऊर्जा रथात संक्रमित झाली. ही दिव्य रथयात्रा पहायला सूक्ष्मातून देवीदेवता कार्यक्रमस्थळी आल्या होत्या. त्यामुळे अवघे वातावरण प्रसन्न अन् चैतन्यमय झाले होते. जसजसा रथ पुढे पुढे जात होता, तसतसे तीनही गुरूंकडून वातावरणात चैतन्य अन् आनंद यांची स्पंदने पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होत होती. सर्व देवीदेवता सूक्ष्मातून रथावर पुष्पवृष्टी करून तीनही गुरूंचा जयजयकार करत होत्या. या चैतन्यमय वातावरणाचा सुपरिणाम रथावर होऊन तोही विलक्षण चैतन्याने भारित झाला.

२. ब्रह्मोत्सवातील चैतन्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील चैतन्यात पुष्कळ प्रमाणात वाढ होणे

तीनही गुरूंमध्ये ब्रह्मोत्सवापूर्वीही पुष्कळ प्रमाणात चैतन्य होते. ब्रह्मोत्सवानंतर तिन्ही गुरूंमधील सकारात्मक ऊर्जेत विलक्षण वाढ झाल्याचे दिसून आले. यातून ‘सप्तर्षी तीनही गुरूंना ‘अवतार’ असे का संबोधतात ?’,  हे लक्षात येते.

३. ब्रह्मोत्सवातील रथयात्रेत सहभागी झालेले साधक अन् साधिका यांच्यावर रथयात्रेतील चैतन्याचा पुष्कळ सकारात्मक परिणाम होणे

सनातनचे साधक परात्पर गुरु डॉक्टरांवर पूर्ण श्रद्धा ठेवून गत २०-२५ वर्षांपेक्षाही अधिक काळापासून साधनारत आहेत. अनेक कठीण प्रसंगांतून तावून सुलाखून त्यांची साधना परिपक्व होऊन वृद्धींगत होत आहे. साधकांचा प्रवास पितृयान मार्गाने असल्याने त्यांना घोर अशा आपत्काळातून मार्गक्रमण करत पुढे जावे लागत आहे. अनिष्ट शक्ती साधकांना नानाविधप्रकारे त्रास देत असल्याने साधकांना विकल्प येणे, मायेचे विचार वाढणे, भविष्याची काळजी वाटणे, साधनेची गती खुंटणे, साधनेचा उत्साह अल्प होणे इत्यादी त्रास होत आहेत. त्यामुळे साधकांवर कधी नव्हे एवढे प्रचंड काळे (त्रासदायक स्पंदनांचे) आवरण आले आहे. असे असले, तरी साधकांवर गुरुकृपाही तेवढीच आहे. हे लक्षात घेऊन साधकांनी साधनेची वाटचाल चालू ठेवणे आवश्यक आहे. साधकांचे त्रास दूर होऊन त्यांचे अवघे जीवन आनंदमय करण्यासाठीच भगवंताने जणू या ब्रह्मोत्वाचे नियोजन केले आहे.

तीनही गुरूंकडून प्रक्षेपित झालेल्या दिव्य चैतन्यामुळे रथयात्रेत सहभागी झालेले साधक अन् साधिका यांच्यावरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण पुष्कळ प्रमाणात अल्प होऊन त्यांच्यातील सकारात्मक स्पंदनांमध्ये अनेक पटींनी वाढ झाली. यातून ‘ब्रह्मोत्सव म्हणजे जणू साधकांसाठी साधनेची अद्वितीय पर्वणीच आहे’, असे जाणवले.

टीप १ – दोन्ही हात जोडून नमस्काराची मुद्रा केलेल्या सौभाग्यवती साधिकांच्या पथकाला ‘सुवासिनी पथकातील साधिका’, असे संबोधले आहे.

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१.७.२०२३)

इ-मेल : [email protected]

वाचकांसाठी सूचना

या लेखात दिलेल्या सारण्यांत काही घटकांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’या उपकरणाद्वारे मोजतांना ती २,३३७ मीटरपेक्षाही अधिक होती; पण ती पूर्ण मोजण्यासाठी पुढे जाणे जागेच्या अभावामुळे शक्य नव्हते. त्यामुळे त्या घटकांतील सकारात्मक ऊर्जा अचूक मोजण्यासाठी ती लोलकाने मोजण्यात आली.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या http://goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.