सातारा नगरपालिकेकडून मोती तळ्याची स्वच्छता चालू !

सातारा येथील मोती तळे

सातारा, २१ मे (वार्ता.) – येथील राजवाडा परिसरात असणार्‍या ऐतिहासिक मोती तळ्याच्या स्वच्छतेचे काम सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून चालू करण्यात आले आहे. पावसाळा चालू होण्यापूर्वी शहरातील नाले, ओढे, तळी स्वच्छ करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना दिल्या होत्या. गत अनेक वर्षंपासून राजवाडा परिसरात असणार्‍या मोती तळ्याची स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोती तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ आणि पाण्यावर शेवाळे साचले होते. त्यामुळे तळ्यातील पाण्याला दुर्गंधी येत होती. सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मोती तळ्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. येत्या आठवडाभरात तळ्यातील शेवाळे आणि गाळ पूर्णतः काढून तळे स्वच्छ करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी दिली आहे.