अमळनेर येथे इयत्ता १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तीमत्त्व विकास कार्यशाळा !

अमळनेर – येथील ‘पूज्य साने गुरुजी ग्रंथालय आणि विनामूल्य वाचनालय’ संचालित विनामूल्य स्पर्धा परीक्षा आणि मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने या वर्षी इयत्ता १२ वी उत्तीर्ण आणि त्यापुढील विद्यार्थी अन् पालकांसाठी दोन दिवसीय करियर मार्गदर्शन, तसेच व्यक्तीमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन १९ आणि २० मे या दिवशी करण्यात आले आहे.

१९ मे या दिवशी सकाळी ८.३० वाजता कार्यशाळेच्या उद्घाटनपर कार्यक्रमाचे अध्यक्ष पू. साने गुरुजी ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, तर काही मान्यवर प्रमुख अतिथी असणार आहेत. २० मे या दिवशी दुपारी ३ वाजता समारोप आणि पारितोषिक वितरण होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ‘मंगळ ग्रह सेवा संस्थे’चे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, तर काही मान्यवर प्रमुख अतिथी असणार आहेत.

या दोन दिवसीय कार्यशाळेत विविध स्पर्धा आणि तज्ञांचे मार्गदर्शन होणार असून विद्यार्थी अन् पालक यांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.