Taiwan Parliament Chaos : तैवानच्या संसदेत खासदारांमध्ये हाणामारी

तायपेई (तैवान) – तैवानच्या संसदेत १७ मे या दिवशी खासदारांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. काही कायद्यांमध्ये पालट करण्यावरून चर्चा चालू असतांना वाद होऊन त्यानंतर हाणामारी झाली.

या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. तैवानमध्ये नवनिर्वाचित सरकार आले आहे. लाई चिंग हे २० मे या दिवशी शपथ घेणार आहेत. त्यापूर्वीच ही हाणामारी झाली आहे.