फ्रान्समध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळाला आग लावण्याचा प्रयत्न !

पॅरिस – एका सशस्त्र व्यक्तीने फ्रान्सच्या वायव्य भागात असलेल्या रूएन शहरात एका यहुदी सिनेगॉजवर (ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर) आक्रमण करून त्याला आग लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आक्रमणकर्त्याला गोळ्या घालून जागीच ठार मारले, असे फ्रान्सच्या गृह मंत्रालयाने सांगितले.

रूएनचे महापौर निकोलस मायर-रोसिगनाओल म्हणाले की, सिनेगॉजवरील आक्रमणामुळे ज्यू समुदायाची कोणतीही हानी झाली नाही; मात्र या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. पोलीस घटनास्थळी पोचले, तेव्हा प्रार्थनास्थळाला आगीने वेढले होते. अग्निशमन दलाच्या सैनिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, असे निकोलस मायर-रोसिगनाओल यांनी सांगितले.