नांदेड शहरात एकूण ६ ठिकाणी धाडी !
नांदेड – येथे १० मे या दिवशी सकाळी आयकर विभागाने ६ ठिकाणी धाडी घातल्या. नांदेड शहरातील संजय भंडारी या ‘फायनान्स’ व्यापार्यासह त्यांच्या भावाचे कार्यालय आणि निवासस्थानी धाडी घालण्यात आल्या आहेत. आयकर विभागाच्या पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड आणि परभणी येथील पथकांनी एकाच वेळी ही कारवाई केली. २५ गाड्यांतून आलेले ६० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
धाड कुठे घातली ?
नांदेड शहरातील शिवाजीनगर येथील ‘भंडारी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या २ कार्यालयांवर, तसेच कोठारी कॉम्प्लेक्स मधील कार्यालय, आदिनाथ पतसंस्था, पारसनगर येथील संजय भंडारी आणि त्यांच्या भावाच्या निवासस्थानी धाडी घालण्यात आल्या.