विविध देश आतंकवाद्यांच्‍या संदर्भात राबवत असलेली धोरणे भारतानेही राबवल्‍यास आपत्‍काळात देशहानी अल्‍प होईल !

फ्रान्‍सने ४ मार्चला पाकच्‍या आतंकवाद्यांना फ्रान्‍समध्‍ये थारा मिळणार नसल्‍याची कडक चेतावणी दिली होती. याअनुषंगाने त्‍याने २३ सहस्र घुसखोरांना देशाबाहेर पाठवण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यात बहुसंख्‍य पाकचे आहेत. देशाच्‍या राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान करणार्‍या इमामालाही त्‍यांनी काढून टाकले. संयुक्त अरब अमिरातनेही (युएई) पाकच्‍या आतंकवादी प्रवृत्तीच्‍या ९५० लोकांना शोधून जहाजात बसवून पाकमध्ये परत पाठवले. ब्रिटनसह या देशांनीही पाकपुरस्‍कृत आतंकवाद्यांच्‍या विरोधात ठोस पाऊल उचलले. भारतानेही या देशांचे अनुकरण करावे, अशी अपेक्षा !
(संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’)