अलीकडेच विदेशात काही कामानिमित्त जाणे झाले. ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, थायलंड या देशांत आपल्या हिंदूंच्या मंदिरामध्ये येणारे सर्व भाविक सात्त्विक वेशभूषा करतात. तेथील रिक्शाचालक किंवा चारचाकी चालक हे मंदिरात इतरांशी बोलतांना ‘नमस्कार’ करूनच विचारणा करतात. ते लोक एकमेकांना भेटतांना ‘नमस्कार’ असे म्हणतात. यांसह मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हिंदु संस्कृतीचे आचरण भाव ठेवून करतात. याउलट भारतात मात्र पाश्चात्त्य विकृतीचे अंधानुकरण चालू आहे. सर्व जगाचा आध्यात्मिक गुरु असलेल्या आपल्या भारतभूमीत भारतीय संस्कृतीचे पालन होत नाही, हे चिंताजनक आहे. यावरून मनात एक विचार आला, ‘आता विदेशातील लोकांना भारतात येऊन भारतियांना हिंदु संस्कृतीचे महत्त्व सांगावे किंवा शिकवावे लागेल का ?’ ती वेळ येऊ नये; म्हणून आपण महान भारतीय संस्कृतीचे आचरण करूया आणि स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंद देऊया.
– श्रीमती स्मिता (शुभा) राव, पणजी, गोवा. (२९.३.२०२३)