कर्मे कशी करावीत ?

‘खाणार्‍याचे आरोग्य आणि रूची यांचा विचार करूनच भोजन बनवा. कपडे असे धुवा की, साबण अधिक व्यय होऊ नये, कपडे लवकर फाटू नयेत आणि कपड्यांना चमकही यावी. झाडतांना असे झाडा की, जणू पूजा करीत आहात आणि कुठेही कचरा राहू नये. असे बोला, जसे श्रीराम बोलत असे. वाणी सारगर्भीत, मधुर, विनययुक्त, दुसर्‍यांना मान देणारी आणि स्वतःला अमानी (मानाची अपेक्षा नसणारी) ठेवणारी असावी.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)