दुष्काळाचे कारण सांगून हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघा ख्रिस्त्यांना अटक !

चिक्कमगळूरू (कर्नाटक) येथील घटना !

चिक्कमगळूरू (कर्नाटक) – दुष्काळाचे कारण सांगून लोकांचे करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघा ख्रिस्त्यांना चिक्कमगळूरू तालुक्यातील एरेहळ्ळी या गावातील पोलिसांनी अटक केली. ‘तीव्र दुष्काळ पडणार आहे. पीक पाणी नसणार आहे. तुम्ही संकटात आहात. तुमच्या देवाकडून काही होणार नाही. तुम्ही आमच्या धर्मात आलात, तर येशू तुम्हा सर्वांचे भले करेल. पीक पाणी येईल. तुमचे कष्ट दूर होतील’, असे सांगून धर्मांतर केले जात होते.

राजन नावाचा ख्रिस्ती अन्य दोघांसह इंदावर, उंडेदासरहळ्ळी आणि एरेहळ्ळी येथील घरांमध्ये जाऊन धर्मांतराचा प्रयत्न करत होता. त्या वेळी ते एरेहळ्ळी येथील प्रसन्न कुमार यांच्या घरीही गेले. धर्मांतर करण्यासाठी आलेल्या लोकांचा हेतू लक्षात आल्यावर प्रसन्न यांनी त्यांच्या विधानांना विरोध केला, तसेच गावकर्‍यांच्या साहाय्याने तिघांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.

संपादकीय भूमिका

हिंदूंना धर्मशिक्षणासह जागतिक घडामोडींविषयी माहिती असणेही आवश्यक आहे. ‘गेल्या वर्षी ख्रिस्तीबहुल युरोपमध्ये उष्णतेने १०० वर्षांतील उच्चांक गाठला होता. त्या वेळी येशू ख्रिस्तांनी युरोपीय लोकांना साहाय्य का केले नाही ?’, असे कुणी विचारल्यास चालेल का ?