‘अनुमाने २ मासांपासून माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये पुष्कळ जळजळ होत होती, तसेच माझे डोळेही दुखत होते. मी उन्हात गेल्यावर मला ऊन सहन होत नव्हते. हा त्रास दूर होण्यासाठी ४.४.२०२३ या दिवशी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला नामजपादी उपाय सांगितले. मी एक मास (४.५.२०२३ या दिवसापर्यंत) नामजपादी उपाय केल्यावर माझ्या डोळ्यांचा त्रास ९० टक्के इतक्या प्रमाणात उणावला.
श्री गुरूंच्या या असीम कृपेसाठी मी श्री गुरु आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.’
– श्रीमती सरोज पांडेय, वाराणसी आश्रम. (१५.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |