१. नृत्याच्या सरावापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शिवस्वरूप नटराज मानून त्यांना प्रार्थना आणि नमस्कार करणे
‘मी नृत्यसाधनेचा एक भाग म्हणून आणि व्यायाम म्हणून प्रतिदिन अर्धा ते एक घंटा नृत्याचा सराव करते. काही वेळा ‘मानसभावाने नृत्य करून मला काय अनुभवायला मिळते ?’, असेही प्रयोग करून बघते. मी सरावापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शिवस्वरूप नटराज मानून त्यांना प्रार्थना आणि नमस्कार करते. नंतर नृत्याच्या सरावाला आरंभ करते.
२. ‘नृत्याच्या संदर्भात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना विचारावे’, असे प.पू. डॉक्टरांना सुचवायचे आहे’, असे जाणवणे
२ – ३ दिवस मला प.पू. डॉक्टरांच्या जागी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकाच शिवस्वरूपात दिसत होते. माझ्या मनात ‘मी सद्गुरु गाडगीळकाका यांच्या समोरच नृत्य करत आहे’, असा भाव निर्माण झाला होता. ‘मी नृत्याचा सराव करत असतांना माझ्या मनात असे काही नव्हते, तरी मला सद्गुरु गाडगीळकाका प.पू. डॉक्टरांच्या जागी कसे दिसले ?’, असे मला वाटले. त्या वेळी ‘नृत्यासंदर्भात मी सद्गुरु गाडगीळकाका यांना विचारावे’, असे प.पू. डॉक्टरांना सुचवायचे आहे’, असे मला जाणवले.
३. सद्गुरु गाडगीळकाका ‘शिवपिंडीवर अभिषेक करत आहेत’, असे नृत्याचा सराव करतांना सूक्ष्मातून दिसणे
आम्ही नृत्य प्रयोगातील सूत्रे, अनुभूतींचे शास्त्र इत्यादी संतांना धारिकांच्या माध्यमातून विचारतो; परंतु ‘सराव करतांना मनात निर्माण झालेल्या सूत्रांविषयी सद्गुरु गाडगीळकाका सूक्ष्मातून मार्गदर्शन करत आहेत’, असे मला जाणवते. एकदा सराव करतांना सूक्ष्मातून ‘सद्गुरु गाडगीळकाका शिवपिंडीवर अभिषेक करत आहेत’, असे मला दिसले. त्या वेळी त्यांच्या हृदयाच्या जागी मला पांढरा प्रकाशबिंदू दिसला.
४. प.पू. डॉक्टरांनी सद्गुरु गाडगीळकाकांची अनुभूती देऊन निश्चिंत करणे
माझ्या मनात अनेकदा प्रश्न किंवा शंका असायच्या, ‘प.पू. डॉक्टर आहेत, तोपर्यंत नृत्याचे अनेक प्रयोग, सूत्रे स्पष्ट होतील; कारण तेच सर्वज्ञ आहेत आणि तेच याविषयी मार्गदर्शन करू शकतात.’ आता या अनुभूतीनंतर माझ्या लक्षात आले,
‘प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या जागी सद्गुरु गाडगीळकाका यांची अनुभूती देऊन मला निश्चिंत केले आहे.’
‘हे गुरुदेवा, तुम्हाला अपेक्षित अशी साधना तुम्हीच माझ्याकडून करवून घ्या’, अशी शरणागतभावाने प्रार्थना करते.’
– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, भरतनाट्यम् विशारद, नागेशी, गोवा.(६.११.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |