बिजापूर (छत्तीसगड) – येथे सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यामध्ये नुकत्याच झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने २ महिलांसह ६ नक्षलवाद्यांना कंठस्थान घातले. पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा परिसरात होळीच्या दिवशी नक्षलवादी गावात घुसले होते. त्यांनी ३ ग्रामस्थांवर कुर्हाडीद्वारे आक्रमण करून त्यांची निर्घृण हत्या केली. चंद्राया मोडियम, अशोक भंडारी आणि कारम रमेश अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांचा खबर्या असल्याचा संशयावरून नक्षलवाद्यांनी या ग्रामस्थांची हत्या केल्याचे वृत्त आहे. यानंतर सुरक्षादलांचे संयुक्त पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. घटनास्थळावरून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
Naxalites spotted at Kukke Subramanya, Dakshina Kannada District, (Karnataka) !
Will the Congress government take note of the #Naxalite activities in Karnataka ? pic.twitter.com/OnYMvDYVEw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 27, 2024