HJS Campaign : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटकातील गजेंद्रगडाची स्वच्छता

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘एक दिवस शिवाजी महाराजांच्या सानिध्यात’ अभियान !

गजेंद्रगडाची स्वच्छता करतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

गजेंद्रगड (कर्नाटक) – उद्या, २८ मार्चला छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे. त्यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटक, तसेच महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात ‘एक दिवस शिवाजी महाराजांच्या सानिध्यात’ हे अभियान राबण्यात येत आहे.

या अभियानाच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अथवा त्यांच्या काळातील गडांना भेट देऊन तेथे सामूहिक स्वच्छता केली जात आहे. या अभियानाच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या येथील गदग येथील गजेंद्रगडाची समितीच्या कार्यकर्त्यांकडून स्वच्छता केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राची पूजा करण्यात आली. वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे सर्व कार्यकर्त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आदर्श राष्ट्र निर्मितीसाठी आम्हाला बळ मिळू दे’, अशी भावपूर्ण प्रार्थना केल्यावर चित्राच्या वरून एक फुल खाली पडले. ‘हा सर्वांच्या प्रार्थनेला प्रसाद मिळाला’, असा भाव सर्वांमध्ये निर्माण झाला. सर्वांनी एकत्रितपणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेतली.