‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) म्हणण्यास भाग पाडले !

मीरा रोड (जिल्हा ठाणे) – येथे २५ मार्च या दिवशी एक अल्पवयीन हिंदु मुलाने रस्त्यात अन्य हिंदूला ‘जय श्रीराम’ म्हणून अभिवादन केले. या रागातून धर्मांधांनी त्याला बेदम मारहाण केली; एवढेच नव्हे, तर त्या हिंदु पीडित मुलाला ‘अल्लाहू अकबर’ असे म्हणण्यासही भाग पाडण्यात आले. या संदर्भातील सीसीटीव्ही चित्रण प्रसारित झाले असून ५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
१. पीडित मुलगा दूध आणण्यासाठी रात्री ९ वाजता घराबाहेर पडला होता. तो त्याच्या गृहसंकुलाच्या दिशेने येतांना वाटेत त्याला ‘सुरक्षारक्षक (वॉचमन) उभा आहे’, असे वाटल्याने त्याने त्याला ‘जय श्रीराम’ असे म्हणून अभिवादन केले.
२. त्याच वेळी तिथे उभ्या असलेल्या ५ जणांच्या धर्मांधांच्या टोळक्याने त्याला थांबायला सांगितले. तो घाबरून गृहसंकुलात पळून गेला. त्याच्या मागून हे धर्मांध आत आले आणि गृहसंकुलाच्या उद्वाहनाजवळ त्याला पकडून मारहाण केली.
३. पीडित मुलाला ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) म्हणायला लावले. पीडित मुलाने भीतीपोटी ते म्हटले.
४. तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने या घटनेची मुलाच्या वडिलांना माहिती दिली. वडील आल्यावर धर्मांध पळून गेले. या प्रकारानंतर पीडित मुलाने धसका घेतला आहे.
५. मीरा रोड परिसरात धर्मांध मुसलमानांकडून धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या घटना वाढत आहेत. २१ जानेवारी या दिवशी येथे धर्मांधांनी हिंदूंच्या गाड्यांवर आक्रमण करून दंगल केली होती. नुकतेच येथे एका धर्मांधाने श्री स्वामी समर्थ यांच्या चेहर्यावर पंतप्रधान मोदी यांचा चेहरा लावलेले चित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या.
संपादकीय भूमिका
|
बांगलादेशात पुन्हा हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड !
मुंबईतील पूर्व समुद्रकिनार्याचा पर्यटन केंद्र म्हणून विकास !
माहीम येथेही रेल्वेस्थानकाबाहेर चाकूने आक्रमण !
रेशन माफिया कलीम कुरेशी टोळीवर ‘मकोका’
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
पनवेल येथील वलप ग्रामपंचायतीमध्ये आढळल्या २ सहस्र ६६० बनावट जन्मनोंदी !