बासखरी (उत्तरप्रदेश) येथे तिघा मुसलमान तरुणांकडून हिंदु विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार !

प्रतिकात्मक छायाचित्र

बासखरी (उत्तरप्रदेश) – येथील तीन मुसलमान तरुणांनी शिकवणी वर्गाला जाणार्‍या एका हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीने विरोध केल्यावर आरोपींनी तिला मारहाण करून ओलीस ठेवले. विद्यार्थिनीच्या भावाने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

हंसवार पोलीस ठाण्याच्या परिसरात रहाणारी २१ वर्षीय हिंदु तरुणी बी.एस्.सी.च्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. सदर विद्यार्थिनी हिरापूर बाजारपेठेत शिकवणी वर्गासाठी सायकलवरून जात होती. मुंडेरा येथील रहिवासी आमिर, फैज आणि फराज यांनी तिला  अडवले. फैज आणि फराज यांनी तरुणीला बलपूर्वक त्यांच्या दुचाकीवर बसवले. त्यांनी तिला गावापासून दूर नेले. काही वेळाने आमिरही सायकलवरून तेथे पोचला. तिघांनीही विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला.

पीडितेने विरोध केल्यावर आरोपींनी तिला मारहाण केली आणि तिला ओलीस ठेवले. बहिणीचे अपहरण झाल्याचे कळताच पीडितेचा भाऊ घटनास्थळी पोचला. तेथे त्याला आमिर अर्धनग्न अवस्थेत, तर त्याची बहीण रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली दिसली.

पीडित मुलीने तिच्या भावाला सर्व घटना कथन केली. यानंतर पीडित मुलीच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. पोलिसांनी तात्काळ तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांचा शोध चालू केला. या संदर्भात पोलीस ठाण्याचे प्रमुख सुनील कुमार पांडे यांनी सांगितले की, पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही मुसलमान त्यास जुमानत नाहीत, हे पोलिसांना लज्जास्पद ! हिंदूंवरील लव्ह जिहादरूपी आघात रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !