नवी देहली – इस्लामिक स्टेटचा भारतातील प्रमुख हारीस फारुखी उपाख्य हरीश अजमल फारुखी याला आसाम पोलिसांनी आसाममधील धुबरी येथे अटक केली. त्याच्यासह अन्य २ आतंकवाद्यांनाही अटक करण्यात आली आहे. या तिघांनी बांगलादेशाची सीमा ओलांडून भारतात घुसखोरी केली होती.
Based on specific input, two top-rung leaders of ISIS in India were apprehended from the Dharmasala area of Dhubri Sector and brought to the STF office in Guwahati. The accused are also wanted accused of NIA. They have been identified as Haris Farooqi @ Harish Ajmal Farukhi of… pic.twitter.com/1Zi4xAHha3
— ANI (@ANI) March 20, 2024
हारीस फारुखी याचा साथीदार अनुराग सिंह उपाख्य रेहान या हरियाणातील पानीपत येथील आतंकवाद्याने इस्लाम स्वीकारला आहे. त्याची पत्नी बांगलादेशी आहे. या दोघांनी आतंकवादाचे प्रशिक्षण घेतले आहेत. त्यांनी भारतात अनेक ठिकाणांहून मुसलमानांना संघटनेत भरती केले आहे. तसेच कारवायांसाठी पैसेही गोळा केले आहेत.