नवी देहली – येथे शाहिना नावाच्या एका मुसलमान मुलीने ‘घरवापसी’ केली आहे. शाहिनाने हिंदु धर्म स्वीकारल्यानंतर ‘आराधना’ हे नाव धारण केले आहे. यानंतर शाहिनाने शिवम् नावाच्या हिंदु मुलाशी देहलीतील आर्य समाज मंदिरात ७ मार्च २०२४ या दिवशक्ष वैदिक पद्धतीने लग्न केले. शाहीनाने हिंदु धर्मात परतणे, हा तिची स्वतःचा निर्णय असल्याचे तिने सांगितले. शाहीनाने देहली प्रशासनाकडे तिच्या आणि तिच्या पतीच्या सुरक्षेसाठी साहाय्य मागितले आहे. देहलीत ‘हिंदु मोर्चा’ नावाची संघटना चालवणारे दीपक मलिकही या वेळी उपस्थित होते.
Delhi : Shahina embraces Hindu Dharma, ties the knot with Shivam#Gharwapasi #Shahina_Becomes_Aradhana pic.twitter.com/CZwx31qDTk
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 12, 2024
दीपक मलिक यांनी सांगितले की, शाहिना हिचे शिवम्वर जवळपास ८ वर्षांपासून प्रेम होते. शाहिनाच्या कुटुंबियांचा या प्रेमसंबंधाला विरोध होता. या दोघांनी ‘हिंदु मोर्चा’शी संपर्क साधला. ‘हिंदु मोर्चा’ने या दोघांना सुरक्षा आणि सहकार्य पुरवण्याचे आश्वासन दिले.
७ मार्च २०२४ या दिवशी २२ वर्षांची शाहिना घरातून निघून २६ वर्षांच्या शिवम्कडे पोचली. दोघेही प्रथम न्यायालयात गेली. न्यायालयात आवश्यक कागदपत्रे सिद्ध केल्यानंतर हे जोडपे शाहदरा परिसरातील आर्य समाज मंदिरात पोचले. येथे शाहिनाने शिवम्शी वैदिक पद्धतीने लग्न केले. शाहिनाने या लग्नामुळे ती आनंदी आणि समाधानी असल्याचे सांगितले.