सातारा (जिल्हा संभाजीनगर) येथील माजी सरपंच फिरोज पटेल याने ४० ते ५० गुंडांसह केली महिलांचे कपडे फाडून त्यांना बेदम मारहाण !

फिरोज पटेल याच्यासह १३ धर्मांधांचा १ घंटा हैदोस !

छत्रपती संभाजीनगर – येथील सातारा परिसरात २४ फेब्रुवारीच्या रात्री एम्.आय.टी. महाविद्यालयाच्या मागे चुलत बहीण-भाऊ घरासमोर शतपावली करत होते. त्या वेळी  रात्री ८ वाजता दुचाकीवरून माजी सरपंच फैजल पटेल आणि सोहेल खान आले. त्यांनी बहीण-भावाला अडवून तिच्याकडे पहात ‘क्या खूब लगती हो’ हे गाणे म्हणत तिच्या अंगावरील ओढणी काढून फेकली. भावाने जाब विचारला असता त्याला मारहाण केली. तोपर्यंत फिरोज खान ४० ते ५० जणांना घेऊन तेथे आला. अर्धा ते १ घंटा गुंडांनी कुटुंबातील महिलांना कपडे फाडून बेदम मारहाण केली. गुंडांनी पीडित तरुणीच्या अन्य कुटुंबातील महिलांचे कपडे फाडून त्यांना मारहाण केली. या प्रकरणी २९ वर्षांच्या तरुणीने तक्रार दिली आहे. फिरोज पटेल, त्याचा मुलगा फैजल पटेल, वसीम पटेल, सोहेल शेख, मोईन पठाण, आमिर पटेल, अरबाज पटेल, इम्रान पटेल, फरदीन पटेल, समीर शेख, रईस पटेल, गुड्डू पटेल, तौफिक आणि इतर ३० ते ४० जण अशी आरोपींची नावे आहेत.

धर्मांधांचे उद्दाम वर्तन

पीडित तरुणीने सांगितले, ‘वाढदिवस असल्याने आम्ही रात्री १२ वाजता केक कापणार होतो. त्याची चर्चा करत असतांना दुचाकीवर आलेल्या टवाळखोरांनी माझी ओढणी ओढून छेड काढली. जाब विचारण्यास गेलेल्या माझ्या कुटुंबियांना टवाळखोरांनी ‘हम सातारा गांव के पटेल हैं, हम ऐसे ही हैं, तुम हमारा क्या उखाडोगे,’ असे म्हणत आम्हा बहीण-भावाला शिवीगाळ, मारहाण केली. माझा गळा दाबून माझे कपडे फाडले. त्या वेळी पुष्कळ भीती वाटली. त्यानंतर दुचाकीवर आणखी काही जण आले. मी घराकडे धावत जात असतांना आरोपींनी मला मारहाण केली. मी दुसर्‍या भावाला भ्रमणभाष करून घराजवळ बोलावले. आई साहाय्याला आली. तिची साडीही फाडली. वडिलांनी विरोध केला, तर त्यांनाही खाली पाडून मारले. भीतीमुळे रात्रभर झोपलो नाही. आता येथे रहाण्याची भीती वाटते.’ (धर्मांधांच्या नांग्या पोलीस कधी ठेचणार ? – संपादक)

गर्भवतीच्या पोटात मारल्या लाथा !

फिरोज पटेलसह त्याच्या गुंडांनी मुलीच्या आईला, दोन्ही भावजयींना आणि बहिणीला मारहाण केली. त्यातील गर्भवती असलेल्या एका भावजयीच्या अंगावरील कपडे फाडून तिच्या पोटात लाथ मारून पाडले. फिरोज पटेल याने, ‘आज सबको नंगा करके मारना है, पकडों सालों को, मार दो,’ असे म्हणत तरुणीच्या भावांना आणि वडिलांनाही बेल्टने, दांड्याने मारहाण केली.

आमदारांच्या मध्यस्थीमुळे पोलिसांत गुन्हा नोंद !

माजी सरपंच फिरोज पटेल आणि त्याचे साथीदार यांनी केलेल्या मारहाणीची माहिती रात्री शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांना समजली. त्यांनी सातारा पोलीस ठाण्यात धाव घेऊन मारहाण झालेल्या कुटुंबाला धीर दिला. गुन्हा नोंद करून आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांना सूचना दिली. ते पोलीस ठाण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. गुन्हा नोंद झाल्यानंतरच आमदार शिरसाट यांनी पोलीस ठाणे सोडले.

संपादकीय भूमिका

कठोर कारवाई न केल्यामुळेच उद्दाम झालेले धर्मांध ! वेळोवेळी हिंसाचार घडवणार्‍या धर्मांधांवर ‘मोक्का’सारखी कठोर कारवाई केली असती, तर शहरातील धर्मांधांच्या हिंसक कारवाया आतापर्यंत संपल्या असत्या !