(हेमात्रेय – हे श्री गुरुदेव दत्तांचे एक नाव आहे.)
१. कु. हेमात्रेय समीर जामदार याने ‘श्रीमद्भगवद्गीता श्लोक पठण आणि त्याचा अर्थबोध’ या ‘ऑनलाईन’ झालेल्या स्पर्धेत त्याच्या गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवणे
‘२३.१२.२०२३ या दिवशी भारतीय उच्च आयुक्तालय (High Commission of India) दार-ए-सलाम, टांझानिया (दक्षिण आफ्रिका) यांच्या सौजन्याने तेथील स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्राने ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवा’त ‘श्रीमद्भगवद्गीता श्लोक पठण आणि त्याचा अर्थबोध’ या विषयावर ‘ऑनलाईन’ स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत कु. हेमात्रेय समीर जामदार (वय १२ वर्षे) याने वय १० ते २४ वर्षे या गटामध्ये भाग घेऊन उत्कृष्ट पद्धतीने विषय सादर करून स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.
२. हेमात्रेय जामदार याचे जाणवलेले अन्य गुण
अ. हेमात्रेय शालेय शिक्षणात प्रगत असून वार्षिक परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण होतो.
आ. तो बुद्धीबळ, क्रिकेट यांसारख्या खेळांत आणि सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन त्यात यशही मिळवतो.
इ. तो नित्यनेमाने देवांची पूजा मन लावून करतो. नवरात्रीच्या उत्सवात तो पूजाघराची सजावट, आरास आणि देवांची मांडणी उत्तम प्रकारे करतो.
ई. तो धर्माचरणी आहे.
उ. त्याला पाककलाही चांगली अवगत आहे.
३. हेमात्रेय जामदार याच्याकडे आलेला आध्यात्मिक वारसा
‘हेमात्रेयचे वडील श्री. समीर रामचंद्र जामदार हे स्थापत्य अभियंता असून दार-ए-सलाम, टांझानिया येथील बांधकाम क्षेत्रातील मोठ्या आस्थापनात कार्यरत आहेत. हेमात्रेयची आई सौ. प्रणोती समीर जामदार ही आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असून ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या आध्यात्मिक संस्थेशी संलग्न आहे. हेमात्रेय हा देवद (पनवेल, महाराष्ट्र, भारत) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे दांपत्य श्री. कृष्णकुमार जामदार आणि सौ. संध्या कृष्णकुमार जामदार यांचा चुलत नातू (पुतण्याचा मुलगा) आहे.’
– सौ. संध्या कृष्णकुमार जामदार (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.१२.२०२३)
विदेशात राहूनही भारतीय संस्कृतीची जोपासना करणारे भारतीय नागरीक !परदेशात दीर्घकाळ राहूनही तिथे भारतीय संस्कृतीची जोपासना करणे आणि वरचेवर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून त्यात उत्साहाने सहभागी होणारे भारतीय नागरिक, विशेषतः तरुण पिढी यांचे हे प्रयत्न खचितच कौतुकास्पद आहेत. – संकलक |