पोलिसांच्या उपस्थितीत मंत्र्यांवर मातीचे गोळे फेकले जाणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

‘दिनांकानुसार साजर्‍या करण्यात येणार्‍या शिवजयंतीनिमित्त, म्हणजे १९ फेब्रुवारी २०२४ या दिवशी देशभरात उत्साहाचे वातावरण असतांना या उत्सवाला गोव्यात गालबोट लागले. सां जुझे दी आरियल (नेसाई) येथील एका खासगी जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करून निघतांना गोव्याचे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर धर्मांध ख्रिस्त्यांनी मातीचे गोळे फेकून आक्रमण केले. मंत्री फळदेसाई यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या वेळी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला.’ (२०.२.२०२४)