श्रीरामाचे अवतारकृत्य आणि श्रीरामाची मूर्ती जोपर्यंत तुम्ही दृढतेने हृदयात धराल तोपर्यंत हिंदूंनो तुमची अवनती सहज नष्ट होण्याची आशा आहे. तो दशरथाचा पुत्र, तो लक्ष्मणाचा भाऊ, तो मारुतीचा स्वामी, तो सीतेचा पती, तो रावणाचा निहंता श्रीराम जोपर्यंत हिंदुस्थानात आहे तोपर्यंत हिंदुस्थानची उन्नती सहज शक्य आहे. श्रीरामाचा विसर पडला की, हिंदुस्थानातला राम नाहीसा झाला.
(साभार : लंडनची बातमीपत्रे – ४४, विजयादशमीचा उत्सव, २६ सप्टेंबर १९०९)