
फोंडा, १४ फेब्रुवारी (वार्ता.) : तिराळ, उसगाव येथे वास्तव्यास असलेल्या एका २३ वर्षीय युवतीवर पालवाडा, उसगाव येथील मंथन गावडे (वय २५ वर्षे) यांनी बिअरची बाटली डोक्यात हाणून प्राणघातक आक्रमण केले. १४ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ७ वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी युवती गंभीररित्या घायाळ झाली असून तिच्यावर बांबोळी येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. पोलिसांनी संशयित मंथन गावडे याला कह्यात घेतले आहे.
(सौजन्य : Prudent Media Goa)
पीडित युवती नेहमीप्रमाणे घराजवळील एका आड वाटेवरून कामावर जात असतांना संशयित मंथन गावडे मार्गात तिची वाट पहात लपून बसला होता. पीडित युवती त्या ठिकाणी आल्यावर संशयित तिच्याकडे प्रेमाविषयी विचारू लागला. युवतीने मंथनला झिडकारल्यावर त्याने रागाच्या भरात हातात असलेली बिअरची बाटली तिच्या डोक्यात हाणली. जोरदार प्रहार झाल्याने बाटली फुटून तिची काच लागल्याने युवती रक्तबंबाळ झाली आणि ती घायाळ अवस्थेत धावत मुख्य रस्त्यावर आली. यानंतर स्थानिकांनी रुग्णवाहिकेच्या साहाय्याने उपचारासाठी प्रथम तिस्क, पिळये येथील आरोग्य केंद्रात तिला भरती केले आणि नंतर तिला तेथून बांबोळी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. यापूर्वीही संशयित मंथन याने पीडित युवतीचा पाठलाग करून तिला धमकी दिली होती. या प्रकरणी तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी संशयित मंथन याला समज देऊन ‘तिच्या वाटेला जाऊ नकोस’, असे त्याला सक्त बजावले होते.
संपादकीय भूमिका
|
सिडको परिसरातील तलावांमधील प्रदूषणाची चौकशी होणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
ग्रामीण भागांत २० विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक अनुज्ञेय ! – डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री
ए.पी.एम्.सी. येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जयंती उत्साहात साजरी
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
देहू (पुणे) ते पंढरपूर ‘सायकल वारी’ची दशकपूर्ती !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !