१. श्री. भालचंद्र सबाहित यांनी केलेली उपासना
‘५.८.२०२३ या दिवशी आम्ही गोकर्ण येथे वाचकांना संपर्क करण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी वाचक अन् धर्मप्रेमी असलेले श्री. भालचंद्र सबाहित यांच्याशी आम्ही साधनेविषयी बोलत होतो. तेव्हा त्यांनी आम्हाला त्यांना आलेल्या अनुभूतींविषयी सांगितले. त्यांनी अग्नि आराधना, विष्णुसहस्रनाम पठण, दुर्गा सप्तशतचंडी पारायण, दत्तकवच पारायण इत्यादी वेगवेगळ्या पद्धतींनी उपासना केली आहे. त्यांना अनेक व्यावहारिक आणि आध्यात्मिक अनुभूतीसुद्धा आल्या आहेत.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि साधक यांच्याप्रती भक्तीभाव असणे
श्री. भालचंद्र सबाहित यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि साधक यांच्याप्रती पुष्कळ भक्तीभाव आहे. ‘गुरुदेव आणि साधक यांच्यामुळेच मला सदैव मार्गदर्शन लाभते’, असे ते म्हणतात.
३. ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रत्येक पान वाचून त्याप्रमाणे अध्ययन आणि साधना करण्याचा प्रयत्न करतात.
४. अनुभूती
४ अ. श्री. सबाहित यांना सनातन पंचांगात असलेली प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांची भावचित्रे (छायाचित्रे) सजीव वाटतात.
४ आ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या भावचित्रातून ते बोलत असल्याचे जाणवणे : प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राविषयी त्यांनी सांगितले, ‘हे भावचित्र ‘३ डायमेंशन’ (त्रिमिती) असल्यासारखे वाटून मला ते सजीव वाटते. ‘या भावचित्रातून प.पू. भक्तराज महाराज माझ्याशी काहीतरी बोलत आहेत’, असे मला वाटते. माझ्या अंतर्मनात जणू प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व जाणवून माझे ध्यान लागते.’
४ इ. प.पू. भक्तराज महाराज सतत समवेत असून ते रक्षण करत असल्याचे जाणवणे : ते सांगतात, ‘माझा साधनामार्ग वेगळा आहे, तरीसुद्धा ‘प.पू. भक्तराज महाराज माझ्यासह आहेत आणि ते माझे रक्षण करत आहेत’, अशी अनुभूती मला येते.’
आम्ही त्यांना पुढील टप्प्याची साधना म्हणून कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करण्याचे महत्त्व सांगितले.
या प्रसंगातून ‘गुरुदेव साक्षात् ईश्वरच असून ते साधना करणार्यांच्या समवेत सदैव राहून आणि त्यांना अनुभूती देऊन साधनेच्या पुढील टप्प्याला घेऊन जातात’, याची आम्हाला जाणीव झाली. त्यासाठी गुरुदेवांच्या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. तारा शेट्टी, उत्तर कन्नड, कर्नाटक. (६.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |