सर्वेक्षणातील आकडेवारी
देहली – ‘कम्युनिटी अगेन्स्ट ड्रंकन ड्रायव्हिंग’ (कॅड) नावाच्या एका संस्थेने राजधानी देहलीत नुकतेच एक सर्वेक्षण केले. यामध्ये सहभागी झालेल्या ३० सहस्र देहलीकरांपैकी ८१.२ टक्के लोकांनी स्वीकारले की, ते दारू पिऊन गाडी चालवतात. शहरातील ६७.८ टक्के लोकांनी रस्त्यांवरून चालतांना असुरक्षित वाटत असल्याचे सांगितले. ‘कॅड’ने गेल्या वर्षी १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर या ५ महिन्यांच्या कालावधीत हे सर्वेक्षण केले. त्यात २० सहस्र ७७६ पुरुष आणि ९ सहस्र २२४ महिला सहभागी झाल्या होत्या.
सर्वेक्षणातील अन्य महत्त्वपूर्ण आकडेवारी !
१. ९० टक्के लोकांना वाटते की, शहरात अपघातांची संख्या वाढली.
२. ७१.१ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी रस्त्यावर मोठा अथवा किरकोळ अपघात पाहिला.
३. बहुतांश लोकांना गाड्यांची वाहतूक अधिक असलेल्या ठिकाणी अधिक असुरक्षित वाटते.
४. शहरातील ८५.३ टक्के लोकांनी मोठ्या किंवा किरकोळ रस्ते अपघातांना बळी पडल्याचे सांगितले.
५. अपघाताची तक्रार करणार्या किंवा पीडितांना साहाय्य करणार्या लोकांची संख्या १५ टक्क्यांपेक्षा अल्प होती. (ही आहे देहलीकरांची संकुचित मनोवृत्ती ! – संपादक)
संपादकीय भूमिकाराजधानीचा देशासमोर हा ‘आदर्श’ ! अशाने सुराज्य कधीतरी येईल का ? |