१४ फेब्रुवारी या दिवशी कथित ‘व्हॅलेंटाईन डे’, म्हणजे ‘प्रेमदिवस’ साजरा केला जातो. त्या निमित्ताने…
१४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ या नावाने ओळखले जाते. या अनुषंगाने व्हॅलेंटाईन कोण होता ? त्याचा इतिहास कोणता आहे ? आपल्या देशात त्याच्या नावाने हा दिवस का साजरा केला जातो ? हा दिवस लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांना कसे प्रोत्साहन देतो, यांसह देशाच्या युवा पिढीला पथभ्रष्ट करण्याचा हा बाजार कसा आहे, यांविषयी आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया.
कर्मनिष्ठ हिंदूंना आवाहन !कर्मनिष्ठ हिंदूंनी सतर्क होऊन अशा कुप्रथांना सामोरे जाऊन कडाडून विरोध केला पाहिजे. अन्यथा देशाच्या जनतेचे धन विदेशी आस्थापनांकडे जात राहील आणि आमची युवा पिढी पाश्चात्त्यांच्या उपभोक्तावादी आणि भोगवादी संस्कृतीचा घास गिळण्यात यशस्वी होईल. ती येणार्या काळासाठी विनाशकारी सिद्ध होईल. असे व्हायला नको. ‘आपल्याच देशात आपल्या श्रेष्ठतम सांस्कृतिक मूल्यांच्या ठिकाणी घृणास्पद विदेशी सभ्यता आणि संस्कृती आम्ही वाढू देणार नाही’, असा संकल्प करायला हवा. पालकांनी आपल्या मुलांना सुसंस्कारित करण्यासाठी प्रयत्न करावा. त्यांच्या अंतर्मनात आपल्या संस्कृतीप्रती प्रेम निर्माण करून त्यांना धर्माभिमानी अन् नीतीवान व्हावे लागेल. स्वातंत्र्यानंतर भारताची निधर्मी लोकशाही वैदिक संस्कृतीचे पतन रोखण्यास पूर्णतः असक्षम राहिली आहे. यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे; कारण हिंदु राष्ट्रात स्वैराचार आणि व्यभिचार यांना उद्युक्त करणार्या सर्व कुप्रथांना संपूर्णतः प्रतिबंध केला जाईल अन् समाजमनावर धर्म आणि साधना यांचे संस्कार कोरले जातील. – श्री. रमेश शिंदे |
१. ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करणे म्हणजे प्रेमाचे बाजारीकरण !
‘व्हॅलेंटाइन डे’चे हिंदु सभ्यता आणि संस्कृती यांच्याशी काहीच देणे-घेणे नाही. प्रेमाचा ठराविक कोणताही दिवस नसतो. जर त्याचा एखादा विशेष दिवस बनवला जात असेल, तर हे केवळ प्रेमाचे बाजारीकरण आहे.
२. निरर्थक गोष्टींना ऊत !
‘इ-कार्ड्स’ युगाचा हा खोटा नीचपणा आहे. वासनांध युवक जाळे पसरवण्यासाठी या दिवसाची प्रतीक्षा करतात. आधुनिकतेच्या नावाखाली युवती आनंदाने या प्रेमाच्या जाळ्यात फसतात. हे प्रेम समर्पणासह होत नाही; उलट भ्रमणभाष आणि ‘व्हॉट्सॲप’ यांवर चालवलेल्या निरर्थक गोष्टींनी ते भरलेले असते.
३. शुभेच्छापत्रांच्या व्यावसायिकांची भरभराट !
काही तरुण-तरुणी मागचा-पुढचा विचार न करता एकमेकांना ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त शुभेच्छापत्र भेट देतात. त्या व्यवसायात मोठमोठी आस्थापने गुंतली आहेत, त्यांना शुभेच्छापत्रे विक्री करायची आहेत, त्यांना भेटवस्तू विकायच्या आहेत, त्यांना चॉकलेट विकायची आहेत आणि म्हणूनच ते दूरचित्रवाहिन्या, वर्तमानपत्रे यांद्वारे भरघोस प्रचार करत आहेत. भारतात अनुमाने १५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक शुभेच्छापत्रांची विक्री होते.
माहितीजालावर (विकिपीडिया) ‘व्हॅलेंटाईन डे’ शोधल्यावर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस (रोमान्स डे) आणि ‘जगातील दुसर्या क्रमांकाच्या शुभेच्छापत्राच्या विक्रीचा दिवस (सेकेंड लार्जेस्ट ग्रीटिंग कार्ड सेल डे) दिसून येतो. केवळ पैसे कमवण्यासाठी व्यापार्यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या प्रथेला पुढे वाढवले.
अमेरिकेच्या शुभेच्छापत्र संघटनेचा (‘ग्रीटिंग कार्ड असोसिएशन’चा) निष्कर्ष आहे की, ‘व्हॅलेंटाईन डे’ची जवळजवळ १०० कोटी शुभेच्छापत्रे प्रत्येक वर्षी संपूर्ण जगात पाठवली जातात. यामुळे ख्रिसमस व्यतिरिक्त ‘व्हॅलेंटाईन डे’ हा शुभेच्छापत्र पाठवणारा दुसर्या क्रमांकाचा सर्वाधिक मोठा दिवस मानला जातो. संघटनेचे म्हणणे आहे की, महिलांच्या तुलनेत अधिकतर पुरुषच दुपटीने धन व्यय करतात.
४. ‘आर्चिस’ आस्थापनाने व्यापारी लाभ कमावणे
जवळजवळ १५ वर्षांपूर्वी ‘आर्चिस’ आस्थापनांची शुभेच्छापत्रे (ग्रीटिंग कार्ड) लेखन सामुग्रीच्या (स्टेशनरी) दुकानात मिळत होती. कालांतराने या आस्थापनाने ठिकठिकाणी ‘आर्चिस गॅलरी’ उघडल्या. आता हे आस्थापन स्वतःचा स्वतंत्र ‘मॉल’ सिद्ध करत आहे. केवळ व्यापारी लाभ कमवण्याच्या उद्देशाने अशी आस्थापने पाश्चात्त्य दिनांचा प्रचार करतात.
५. विविध वस्तूंद्वारे युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
विदेशी आस्थापनेही अशा माध्यमातून त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. यामध्ये युवकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या युक्त्या वापरल्या जातात. दुर्भाग्याने आमची युवा पिढी या आस्थापनांच्या मायाजाळात फसत आहे. गुलाबाचे फूल, प्रेमाचे प्रतीक, हृदयाच्या आकाराचे लाल फुगे, चॉकलेट, भेटवस्तू, गर्भनिरोधक गोळ्या, निरोध (कंडोम) इत्यादींची दुकाने वाढवण्यासाठी या दिवसांत विज्ञापनांच्या माध्यमातून पुष्कळ वाढवून चढवून प्रचार केला जातो.
उद्योग क्षेत्रातील संघटना ‘एसोचेम’च्या नुसार या दिवशीसाठी भेटवस्तूंची अधिक प्रमाणात विक्री केल्यामुळे भारतियांकडून २२ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम व्यय होतात.
६. निरोध आणि गर्भनिरोधक औषधे यांच्या मागणीत वाढ !
देहली येथील औषधविक्री करणार्या व्यक्तीने सांगितले, ‘‘वर्ष २०१४ मध्ये १० फेब्रुवारीपासूनच निरोध आणि गर्भनिरोधक औषधांची मागणी १० पटीने वाढली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी या वस्तू संपल्या होत्या.’’
वर्ष २०१३ मध्ये ‘ऑनलाईन’ खरेदीचे संकेतस्थळ ‘स्नॅपडिल डॉट कॉम’वरून भारतात ‘व्हॅलेंटाईन डे’च्या एकाच दिवशी दीड लाख निरोध विकले गेले. हे असे प्रेम असू शकते का ? किंवा हा वासनेचा बाजार तर नाही ना ? वास्तविक हा विदेशी सण आम्हाला कोणत्या दिशेकडे ढकलत आहेत ? अशा सणामुळे (?) भारताचे भवितव्य काय असेल ? निरोधच्या एक आस्थापनाच्या (‘कंपनी’च्या) सर्वेक्षणानुसार ‘व्हॅलेंटाईन डे’च्या कालावधीमध्ये निरोधच्या विक्रीमध्ये २५ पटींनी वाढ होते, अशा प्रेमदिवसाचे घृणास्पद सत्य जाणून कुणालाही लाज वाटेल; परंतु सत्य लपवले जाऊ शकत नाही.
७. भारतियांनो, विचार करा !
पाश्चात्त्य देशांमध्ये विवाह संस्कृतीच नाही. तेथे सर्वसाधारणपणे विवाह होत नाहीत. जे विवाह करू इच्छितात, ते ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करतात; पण आपण भारतात हा दिवस का साजरा करतो ? या दिवशी एवढा व्यय का करतो ? जेथे प्रतिदिन भूकबळी आणि आर्थिक संकट यांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशा वेळी आपण भारतियांनी ‘अशा प्रकारचा अपव्यय करण्याचे अधिकार आपल्याला आहेत का ?’, याचा विचार करावा. हा अपव्यय राष्ट्र आणि समाज हितासाठी आहे का ?
८. ‘व्हॅलेंटाईन डे’ उत्सव नाही !
कोणत्याही सामाजिक उत्सवाला ‘उत्सव’ कधी म्हणतात ? जेव्हा तो समन्वय, सामंजस्य, सुसंवाद किंवा बंधुत्वभाव वाढवणारा असेल, त्या देशाच्या मूळ सांस्कृतिक परंपरांशी जोडण्याची क्षमता असलेला असेल, समरसतेच्या भावाला प्रोत्साहित करतांना समाजाच्या अधिकाधिक सदस्यांचा उत्थान करणारा असेल आणि समाजाला आध्यात्मिक प्रगतीकडे उन्मुख करणारा असेल तेव्हा ! ‘व्हॅलेंटाईन डे’ यांच्यापैकी एकाही मापदंडावर यशस्वी होत नाही. या दिवसाचे ना नैसर्गिक, ना सामाजिक, ना आध्यात्मिक महत्त्व !
९. ‘व्हॅलेंटाईन डे’चा वाढता दुष्प्रचार !
भारतात या तथाकथित उत्सवाच्या आगमनापूर्वी युवक-युवती प्रेम करत नव्हते का ? प्रसारमाध्यमांचा दुष्प्रचार याला केवळ युवक-युवतींच्या समोर लैंगिकतेच्या रूपात मांडत नाही का ? दूरचित्रवाणीवर ‘व्हॅलेंटाईन डे’चा हा बेढब दुष्प्रचार निष्पाप मुलांकडून त्यांचे बालपण हिरावून घेऊन त्यांना वेळेपूर्वीच लैंगिक जिज्ञासा आणि वाईट कृती करण्यासाठी प्रवृत्त करत नाही का ? जर या प्रश्नांची उत्तरे ‘होय’ अशी असतील, तर हे चांगले नाही. उलट सामाजिक विद्रूपता पसरवण्यासाठी केलेला हा कुत्सित प्रयत्न आहे.
१०. ‘व्हॅलेंटाईन डे’ला भारतीय संस्कृतीमध्ये स्थान नाही !
ज्यातून केवळ बहुराष्ट्रीय आस्थापनांना लाभ होणार असेल आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण देश अन् समाज यांना भोगावे लागत असतील, तर हा दिवस प्रेमाचा नसून वासनेचा आहे. त्याला भारतीय संस्कृतीमध्ये कोणतेच स्थान नाही. भारतीय संस्कृती प्रेम प्रदर्शित करणे किंवा आपल्या आवडीचा जोडीदार निवडण्ो याच्या विरुद्ध नाही; परंतु विवाहापूर्वी एक दुसर्याला चांगल्या प्रकारे जाणून घेण्याच्या नावावर ‘लिव्ह इन रिलेशन’ सारख्या अनुचित प्रथेमध्ये एका छताखाली रहाण्याची आज्ञा देत नाही. ‘व्हॅलेंटाइन डे’ भविष्य विकृत करतो आणि जीवनाला कठीण बनवतो.
११. बहुराष्ट्रीय आस्थापनांची चालाखी !
भारताच्या ५१ व्या आंतरराष्ट्रीय फिल्म समारंभात (आई.एफ्.एफ्.आई.) ‘१४ फेब्रुवरी एंड बियॉन्ड’ हा चित्रपट प्रसारित झाला. चित्रपटाचे दिग्दर्शक उत्पल कलाल यांनी म्हटले, ‘‘हा दिवस व्यावसायिक प्रवृत्ती आणि समाजाचे मानसिक स्वास्थ्य यांवर येणारे संकट दर्शवतो. बहुराष्ट्रीय आस्थापने चालाखीने प्रेमाच्या नाजूक भावनांचा वापर करून या दिवसाला व्यापारी रूप देतात. प्रेमाच्या नावावर १०-१२ वर्षांच्या मुलींना लैंगिक संबंधांमध्ये गुंतवतात. याविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.’’
१२. ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणजे उच्छृंखलतेचे द्योतक !
‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणजे पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणारा एक विकृत कुसंस्कार आहे. यामुळे युवा पिढी नैतिकतेला बाजूला ठेवून, भोगवादाकडे प्रवृत्त होत आहे. स्वैराचाराला प्रोत्साहन देणारा हा दिवस उच्छृंखलतेचे द्योतक झाला आहे. युवा वर्गाला सभ्य आणि सुसंस्कृत वैदिक संस्कृतीच्या मर्यादांना भंग करण्यासाठी अयोग्य प्रकारे प्रेरणा देतो.
१३. ‘व्हॅलेंटाइन डे’ हा अशुभ दिवस !
‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणजे हिंदु युवा पिढीचे राष्ट्रांतर आणि धर्मांतर करणारा अशुभ दिवस आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणे म्हणजे पश्चिमी संस्कृतीच्या अनैतिकतेचे अनुकरण करणे अन् हिंदु संस्कृतीचे अवमूल्यन करणे होय. यामुळे हिंदूंच्या एक दिवसाचे राष्ट्रांतर आणि धर्मांतर याला प्रोत्साहन मिळते.
१४. कर्मनिष्ठ हिंदूंना आवाहन !
कर्मनिष्ठ हिंदूंनी सतर्क होऊन अशा कुप्रथांना सामोरे जाऊन कडाडून विरोध केला पाहिजे. अन्यथा देशाच्या जनतेचे धन विदेशी आस्थापनांकडे जात राहील आणि आमची युवा पिढी पाश्चात्त्यांच्या उपभोक्तावादी आणि भोगवादी संस्कृतीचा घास गिळण्यात यशस्वी होईल. ती येणार्या काळासाठी विनाशकारी सिद्ध होईल. असे व्हायला नको.
‘आपल्याच देशात आपल्या श्रेष्ठतम सांस्कृतिक मूल्यांच्या ठिकाणी घृणास्पद विदेशी सभ्यता आणि संस्कृती आम्ही वाढू देणार नाही’, असा संकल्प करायला हवा. पालकांनी आपल्या मुलांना सुसंस्कारित करण्यासाठी प्रयत्न करावा. त्यांच्या अंतर्मनात आपल्या संस्कृतीप्रती प्रेम निर्माण करून त्यांना धर्माभिमानी अन् नीतीवान व्हावे लागेल.
स्वातंत्र्यानंतर भारताची निधर्मी लोकशाही वैदिक संस्कृतीचे पतन रोखण्यास पूर्णतः असक्षम राहिली आहे. यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे; कारण हिंदु राष्ट्रात स्वैराचार आणि व्यभिचार यांना उद्युक्त करणार्या सर्व कुप्रथांना संपूर्णतः प्रतिबंध केला जाईल आणि समाजमनावर धर्म अन् साधना यांचे संस्कार कोरले जातील.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.