मुंबई – भाजपचे नेते नितेश राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना सरकारकडून ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. नितेश राणे हे लँड जिहाद आणि लव्ह जिहाद यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतात. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे; म्हणून सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.