समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा नोंद

मुंबई – एन्.सी.बी.चे (अमली पदार्थ नियंत्रण विभाग) माजी विभागीय संचालक आय.आर्.एस्. अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. सीबीआयने नोंद केलेल्या एफ्.आय.आर्.वर तपास करतांना ईडीने ही कारवाई केली आहे. वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

यानंतर समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी एक पोस्ट प्रसारित केली आहे. केतकी चितळे यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. क्रांती यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ज्यांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा हात, ज्यांच्या मनगटात आई भवानीच्या तलवारीचे बळ आहे, त्याला भीती कसली आणि कुणाची ? त्रास त्यालाच होतो जो सत्याच्या बाजूने लढत असतो. पण जेव्हा पावनखिंड वाचून आपण मोठे झालेलो असतो तेव्हा ही लढाई फारच लहान आणि क्षुल्लक वाटते. एक जीवनसंगिनी म्हणून मला तुझा अभिमान वाटतो. तू लढ, तू लढ…विजय तुझाच आहे.

काय आहे प्रकरण ?

वर्ष २०२१ मध्ये कॉर्डेलिया क्रूझवरून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन  याला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर अभिनेता शाहरुख खानकडून लाच मागितल्याचा आरोप आहे.