काठमांडू – नेपाळमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीच्या ३ वेगवेगळ्या प्रकरणांत १४ भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना धारण शहरातून कह्यात घेण्यात आले. याविषयी मिळालेलल्या अधिकृत माहितीनुसार एका प्रकरणात ४ भारतीय नागरिकांकडून ५० किलो चरस जप्त करण्यात आला, तर दुसर्या एका प्रकरणात ९९ किलो अमली पदार्थांसह ५ जणांना अटक करण्यात आली. तसेच तिसर्या प्रकरणात ५ भारतीय नागरिकांना अमली पदार्थांसह कह्यात घेण्यात आले, अशी माहिती नेपाळ पोलिसांनी दिली.

भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
ठाणे येथे १ कोटी २८ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य जप्त !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !