‘व्हॅलेंटाईन डे’ : ‘लव्ह जिहाद’च्या धर्मांतराच्या षड्यंत्राला वृद्धींगत करणारा दिवस !

१४ फेब्रुवारी या दिवशी कथित ‘व्हॅलेंटाईन डे’, म्हणजे ‘प्रेमदिवस’ साजरा केला जातो. त्या निमित्ताने…

पाश्चात्त्यांचे विकृत ‘डे’ साजरे करण्याची पद्धत हद्दपार करण्यासाठी सरकारने त्यावर बंदी आणावी, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

आमच्या देशात प्रेमाचा एवढा भीषण दुष्काळ पडला होता की, कुणीतरी ‘व्हॅलेंटाईन’ नावाची व्यक्ती आली आणि आम्हाला प्रेम व्यक्त करण्याचा दिवस सांगून निघून गेली. काही देशांमध्ये १४ फेब्रुवारी या दिवशी ‘व्हॅलेंटाईन डे’, म्हणजे ‘प्रेमदिवस’ साजरा केला जातो. सध्या आमच्या देशाच्या युवा पिढीतही या दिवसाचे मोठे आकर्षण आहे. याला कुणी पश्चिमी विकृती म्हणून विरोध केला, तर वादविवाद होऊ लागतो, ‘आम्हाला ‘नैतिकतेचे धडे’ शिकवू नका ! आजची युवा पिढी योग्य-अयोग्य जाणते, तिला शिकवण्याची काही आवश्यकताच नाही. आम्हाला आता आधुनिक व्हावेच लागेल. प्रेमासाठी धर्म कशाला बघायचा ?’; परंतु अधिकांश लोक वास्तविकता जाणतच नाहीत. त्यामुळे आधी आपण हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे की, व्हॅलेंटाईन कोण होता ? त्याचा इतिहास काय आहे ? भारतात त्याच्या नावाने हा दिवस का साजरा केला जातो ?

‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात प्रबोधन करून संस्कृतीरक्षण कसे करावे ?

श्री. रमेश शिंदे

अ. ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करू नये, यासाठी शाळा, महाविद्यालय आणि खासगी शिकवणीवर्ग येथे जाऊन शिक्षक अन् विद्यार्थी यांचे प्रबोधन करावे !

आ. ‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रोत्साहन देणार्‍या प्रसारमाध्यमांचा वैध मार्गाने निषेध करावा !

इ. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात प्रबोधन करण्यासाठी व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, लघुसंदेश या माध्यमांतून प्रसार करावा आणि याविषयीच्या हस्तपत्रकांचे वितरण करावे !

ई. एखादी मोहीम ठरवली असल्यास तिची माहिती प्रथम करून घ्यावी आणि त्यानुसार संबंधित विषय सांगावा. इतरांना सहभागी होण्यासाठी आवाहन करावे.

उ. वार्षिक अभियानांच्या सूचीनुसार अभियान चालवावे, स्थानिक विषयानुसार अन्य अभियान चालवावे.

– श्री. रमेश शिंदे

१. ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणे म्हणजे मानसिक आणि सांस्कृतिक धर्मांतर करणेच होय !

‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणे, म्हणजे पाश्चात्त्य लोकांच्या अनैतिक आचरणाचे अनुकरण करणे आणि हिंदु संस्कृतीचे अवमूल्यन करणे अन् संस्कृतीला तिलांजली देणे होय. पाश्चात्त्य परंपरेच्या अंधानुकरणामुळे आमची मुळे आपल्या संस्कृतीपासून कापली जात आहेत. हिंदु सण-उत्सव धर्माशी निगडीत असून ते नैतिकता अन् सदाचार यांचे शिक्षण देतात; परंतु पाश्चात्त्य प्रथा या अनैतिकता आणि व्यभिचार यांचे शिक्षण देतात. आपण जर आपली श्रेष्ठ संस्कृती सोडून इतर धर्मांच्या प्रथा-परंपरांचे अनुकरण करू लागलो, तर त्यातून मानसिक आणि सांस्कृतिक धर्मांतरच होते.

२. सैन्यदलात अधिकारी अल्प असण्यामागील कारण

भारतीय सैन्यात योग्य अधिकारी अल्प आहेत; कारण आजच्या युवा वर्गाचे शारीरिक आणि मानसिक बळ वाढण्याऐवजी ते बाह्य सौंदर्य अन् थाटामाटाच्या मागे लागून वेडे झालेले आहेत.

३. युवा वर्गाने राष्ट्रीय दायित्वाविषयी निष्काळजी होऊ नये !

जेव्हा इंग्लंडच्या सेनेने युद्धात फ्रान्सचा दारूण पराभव केला, तेव्हा काही विद्वानांनी टीका केली होती की, फ्रान्सचा पराजय युद्धभूमीत झाला नसून पॅरिसच्या ‘डान्सबार’मुळे झाला आहे; कारण त्या वेळी फ्रान्सचा युवा वर्ग डान्सबारच्या जाळ्यात फसला होता आणि आपल्या राष्ट्रीय दायित्वाविषयी अत्यंत निष्काळजी झाला होता. भविष्यात आपल्यालाही कधी याच्याशी मिळत्या-जुळत्या टिकेला सामोरे जावे लागले, तर तो दिवस भारतासाठी अत्यंत दुर्भाग्याचा ठरेल.

४. देशाला विनाशाच्या गर्तेत जाण्यापासून वाचवा !

देशाचे कर्णधार, राजकीय नेते, विचारवंत, साहित्यिक, वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या आणि शिक्षक वर्ग यांनी अयोग्य पश्चिमी परंपरेच्या विनाशकारी परिणामांना ओळखावे अन् त्या थांबवण्याचा प्रयत्न करावा. हे कार्य केवळ कायदा करून होणार नाही, तर नवीन पिढीला धर्मशिक्षण देणे आणि मार्गदर्शन करणे यांतूनच होईल. या विकृतीला थांबवल्याविना युवा पिढीला आणि परिणामस्वरूप देशाला विनाशाच्या गर्तेत जाण्यापासून वाचवण्यासाठी दुसरा कोणताच उपाय नाही. यामध्ये जेवढा अधिक विलंब होईल, त्याचा परिणाम तेवढाच भयावह होईल.

५. ‘लव्ह जिहाद’चे भीषण संकट !

हिंदूंनी भयानक संकटाला ओळखणे आवश्यक आहे, ते संकट म्हणजे ‘लव्ह जिहाद’ ! ‘लव्ह जिहाद’ हा आतंकवादाचाच एक प्रकार आहे. राष्ट्रीय नेमबाज तारा सचदेवसारख्या राष्ट्रीय पातळीवरील सुपरिचित हिंदु युवतीलाही या षड्यंत्रात फसवले गेले. या घटनेला सर्वांनी दूरचित्रवाहिनीवर पाहिलेच असेल. ‘लव्ह जिहाद’शी जोडलेल्या निकिता तोमरसारख्या अनेक घटना समोर येतात. त्यामुळे लव्ह जिहादच्या संदर्भात भाजपचे नेते आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्या विरोधात कायदाही आणला आहे.

५ अ. ‘लव्ह जिहाद’ म्हणजे फसवणूकच ! : इस्लाममध्ये ‘जिहाद’ शब्दाचा अर्थ ‘धर्माच्या रक्षणासाठी युद्ध करणे’, असा होतो. वर्तमानकाळात लव्ह जिहादचा अर्थ आहे, विवाह किंवा प्रेमाचे आमीष दाखवून इस्लाममध्ये धर्मांतर करून घेणे आणि संबंधित युवतीचे शोषण करणे. ‘लव्ह जिहाद’ ही फसवणूक आहे. त्या नावाखाली एखादा मुसलमान युवक किंवा माणूस कोणत्याही गैरमुस्लिम युवती किंवा महिला यांच्याशी खोटे बोलून, महागड्या भेटवस्तू देऊन प्रेमाच्या जाळ्यात फसवतात आणि नंतर तिची खासगी छायाचित्रे काढून असाहाय्य बनवून तिला मुसलमान होण्यासाठी विवश केले जाते.

५ आ. हिंदु युवतींना धर्मभ्रष्ट करणारा ‘लव्ह जिहाद’ ! : ‘व्हॅलेंटाईन डे’ हा दिवस या जिहादी विचारसरणीच्या तरुणांसाठी लव्ह जिहादची मोठी संधीच असते. ‘व्हॅलेंटाईन डे’चे निमित्त करून हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात फसवण्यासाठी जिहादी युवक गुलाबाचे फूल, शुभेच्छापत्र किंवा भेटवस्तू देतात. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या माध्यमातून हिंदु युवतींना धर्मभ्रष्ट करणारा ‘लव्ह जिहाद’ काय आहे, याविषयी आपल्या घरातील सदस्य, नातेवाईक आणि ओळखीच्या भगिनी यांना जागृत केले पाहिजे. याविषयीची माहिती असणार्‍या मुली आणि मैत्रिणी यांनाही समजावून सांगावे. ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे एक दिवस मजा वाटते; परंतु भविष्यात जन्मभर जे दुःख सहन करावे लागते, त्याची कल्पनाही करता येत नाही.

५ इ. ‘लव्ह जिहाद’शी संबंधित प्रकरणे ! : वर्ष २००९ मध्ये केरळ उच्च न्यायालयात कार्यरत न्यायमूर्ती के.टी. शंकरन् यांना केरळ आणि मंगळुरू येथे बळजोरीने धर्मांतर केले जाणार असल्याविषयी काही संकेत मिळाले होते. त्यांनी केरळ सरकारला अशा घटना रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले. न्यायालयाने म्हटले होते, ‘प्रेमाच्या नावावर एखाद्याला फसवून किंवा इच्छेविरुद्ध धर्मांतर करण्यासाठी भाग पाडू नये.’ एका खटल्यात एका युवतीचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याविषयीचे आरोप त्यात लावले होते. विशेष शाखेच्या अहवालावरून बातमी आली होती की, केरळच्या काही संघटना, काही शहरे, विशेषतः महाविद्यालयात योजनाबद्धरित्या हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींसमवेत इस्लाममध्ये धर्मांतर करण्यासाठी ‘प्रेमाचे नाटक’ करण्याचा खेळ खेळला जात होता.

राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज तारा सचदेवने उघडपणे म्हटले होते की, तिच्या सासरच्या लोकांनी इस्लाम मान्य करण्यासाठी तिचा पुष्कळ छळ केला होता. ताराने म्हटले होते की, तिने ज्या व्यक्तीशी विवाह केला होता, तिच्या प्रियकराने स्वतःचे नाव ‘रणजितसिंह कोहली’ म्हणजे हिंदु नाव सांगितले होते; परंतु ते खोटे होते आणि त्याचे खरे नाव ‘रकिबुल हसन’ असे होते. या प्रकरणात ‘सीबीआय’ने चौकशी केली आणि पीडितेच्या पतीसमवेत सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.

६. ‘लव्ह जिहाद’च्या विकृतीला प्रोत्साहन देणारे सर्वांत मोठे गुन्हेगार !

केवळ स्वतःचा प्रसार करणे किंवा दर्शकसंख्या वाढवणे आणि विज्ञापनाच्या रूपात धन कमावणे यांकडे लक्ष देणारी वर्तमानपत्रे अन् वृत्तवाहिन्या ‘लव्ह जिहाद’च्या विकृतीला प्रोत्साहन देण्यात सर्वांत मोठे गुन्हेगार आहेत. या वाईट परंपरेमुळे समाजाची मुळे पोखरली जात आहेत. समाजात अमर्यादशील आचरण पसरवले जात आहे. यामुळे गुन्ह्यांची लाट आली आहे. प्रत्येक दिवशी लैंगिक गुन्ह्यांच्या बातम्या येत असतात. वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाहिन्या यांच्या माध्यमातून पसरवली जाणारी गैरसंस्कृती हेच यामागील मूळ कारण असते. यामुळे किशोरवयीन मुलांचे आई-वडील असाहाय्य होतात. आपल्या मुलांवर रात्रंदिवस लक्ष ठेवणे शक्य नसते आणि तसे करणे व्यावहारिकही नाही. नवीन पिढीनेच विचार केला पाहिजे की, अशा माध्यमातून फसल्यामुळे त्यांचे स्वास्थ्य, ‘करियर’ आणि कौटुंबिक जीवन यांना हानी पोचत आहे. ही विकृती आमच्या नवीन पिढीला पोखरून काढत आहे. आजचा युवा वर्ग महान भारतीय संस्कृतीच्या मर्यादा तोडत आहे आणि तो इतका असहनशील झाला आहे की, थोड्याशा निराशेत जाऊन तो भयंकर प्रतिक्रिया व्यक्त करतो.

७. ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करा !

‘व्हॅलेंटाईन डे’ नावाचा अनाचार रोखण्यासाठी ‘योग वेदांत सेवा समिती’ यांसारख्या काही सामाजिक संस्था काही वर्षांपासून ‘मातृ-पितृ पूजनदिना’चे आयोजन करत आहेत. ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करण्यामुळे आई-वडिलांशी चांगले वागले पाहिजे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे, हे लक्षात येते.

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.