|
बरेली (उत्तरप्रदेश) – येथे नमाजपठणानंतर मुसलमान जमावाने हिंसाचार केला. उत्तरप्रदेशात बेकायदेशीर मशिदी, मदरसे आणि मुसलमानांच्या इमारती यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्याला ‘इंडियन मुस्लिम कौन्सिल’चे (आय.एम्.सी.चे) प्रमुख मौलाना (इस्लामचा अभ्यासक) तौकीर रझा मागील काही दिवसांपासून विरोध करत आहे. नमाजपठणाच्या वेळी त्याने केलेल्या आवाहनानंतर जमावाने हिंसाचार केला. या वेळी २ हिंदु तरुणांना पकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्या दुचाकीची हानी करण्यात आली. या हिंसाचारानंतर मौलाना तौकीर रझा याला बिहारीपूर पोलीस चौकीजवळ अटक करण्यात आली आणि नंतर सोडून देण्यात आले. (रझा वारंवार प्रभोभक भाषणे करत आहे; मात्र त्याच्यावर कठोर कारवाई न झाल्याने तो उद्दाम झाला आहे ! – संपादक)
सौजन्य :न्यूज इंडिया
उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे हिंसाचार भडकल्यानंतर मौलाना तौकीर रझा अधिकच संतप्त झाला आहे. या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उत्तरदायी असल्याचा आरोप त्याने केला. उत्तराखंडमध्येही मुसलमानांच्य अनधिकृत बांधकांमवर बुलडोझर चालवण्यात येत आहे. ही कारवाई थांबवण्याची मागणी त्यांनी केली. रझा म्हणाला होता, ‘आता कोणताही बुलडोझर खपवून घेतला जाणार नाही. न्यायालय नोंद घेत नसेल, तर आम्ही आमचे संरक्षण करू. आमच्यावर आक्रमण करणार्याला मारण्याचा आम्हाला कायदेशीर अधिकार आहे.’
संपादकीय भूमिकाचिथावणीखोर भाषणे करून हिंसाचार भडकावणार्या रझा याच्यासारख्या धर्मांध नेत्याला आजन्म कारागृहात डांबण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, असेच जनतेला वाटते ! |