दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी पक्ष सोडला !; नांदेड येथे २ सहस्र जणांना विषबाधा !…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी पक्ष सोडला !

मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. त्यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. मुंबईतील वांद्रे आणि परिसरातील अल्पसंख्यांक समुदायात सिद्दीकी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. १० फेब्रुवारीला वांद्रे येथे होणार्‍या ‘सरकार आपल्या दारी’ या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते तरुणवयात काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते आणि ते ४८ वर्षे पक्षात राहिले.


नांदेड येथे २ सहस्र जणांना विषबाधा !

नांदेड – लोहा तालुक्यातील कोष्ठेवाडी येथे बाळूमामांच्या मेंढ्या कार्यक्रमात भगर खाल्याने २ सहस्र भक्तांना विषबाधा झाली. यामुळे त्यांना विविध रुग्णालयांमध्ये भरती करावे लागले.


वाशी रेल्वेस्थानकात रेल्वेखाली आल्याने एकाचा मृत्यू !

वाशी – वाशी रेल्वेस्थानकात रुळ ओालांडतांना गाडीखाली आलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. राजेंद्र खाडके असे त्यांचे नाव आहे. ते गाडीखाली अडकून घायाळ झाले होते. त्यामुळे सर्व प्रवाशांनी शक्तीनिशी गाडीचा डबा हलवला होता. त्यांना खालून बाहेर काढले; पण यात ते गंभीर घायाळ झाले होते. उपचारांच्या वेळी त्यांचा मृत्यू झाला.

रेल्वेचा डबा हालवण्याचा प्रवाशांचा प्रयत्न !