
कोल्हापूर – शंकराचार्य यांचे स्थान हिंदु धर्मात सर्वाेच्च आहे. त्यामुळे करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्यावर होणारी टीका, मठावर मोर्चा काढण्याची भाषा आम्ही खपवून घेणार नाही, अशी चेतावणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख श्री. रवीकिरण इंगवले यांनी दिली आहे. शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी पुणे येथे केलेल्या एका विधानाचा विपर्यास करत काही पुरोगामी कार्यकर्त्यांनी ‘शंकराचार्य यांनी जाहीर क्षमा मागावी; अन्यथा पीठावर मोर्चा काढू’, अशी चेतावणी दिली आहे. शंकराचार्यांचा निषेध करण्यासाठी ‘आम्ही भारतीय लोक आंदोलना’च्या वतीने चित्रदुर्ग मठात बैठक घेण्यात आली. त्यात ही मागणी करण्यात आली.
महापुरुषांना जातीपातींमध्ये न अडकवता त्यांच्या विचारांचे जतन करा ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप
प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : २६.०७.२०२६)
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती