नागपूर येथे बसमध्ये आढळला बाँब !

नागपूर – शहरातील मध्यवर्ती गणेशपेठ बसस्थानकातील अहेरी आगाराच्या बसमध्ये ७ फेब्रुवारी या दिवशी दुपारी १ वाजता ‘टिफिन बाँब’ (जेवणाच्या डब्यात ठेवण्यात आलेला बाँब) आढळून आला. ही बस ३ दिवसांपासून याच आगारात उभी होती. ६ फेब्रुवारीला ती सावनेर येथे जाऊन आली. पोलीस आणि आतंकवादविरोधी पथक या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. हा बाँब नष्ट करण्यासाठी तो सुराबर्डी येथे नेण्यात आला आहे. संबंधित ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला.

संपादकीय भूमिका 

असुरक्षित नागपूर !