We Wants Only 3 Places : पांडवांनी ५ गावे मागितली होती, आम्ही केवळ ३ जागा मागत होतो !

योगी आदित्यनाथ यांचे विधानसभेत विधान !

योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – जेव्हा आपण अयोध्येविषयी बोलतो, तेव्हा आपल्याला पांडवांची आठवण येते. भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाकडे गेले होते आणि म्हणाले होते की, ‘पांडवांना ५ गावे द्या आणि सर्व इंद्रप्रस्थ ठेवा’; पण दुर्योधन तेही देऊ शकला नाही. त्याने भगवान श्रीकृष्णालाही ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला. अयोध्या, काशी आणि मथुरा यांच्याविषयी असेच घडले. पांडवांनी केवळ ५ गावे मागितली होती, तर येथे आमची श्रद्धा केवळ ३ साठी सांगत आहे. ही देवतांच्या अवतारांची भूमी आहे. हा आमचा आग्रह आहे, असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत केले.

योगी आदित्यनाथ ज्ञानवापीविषयी म्हणाले की, भारतात लोकांच्या श्रद्धेचा अपमान होत असून बहुसंख्य समाजाने भीक मागावी, असे जगात कुठेही घडले नाही. जे काम चालू आहे, ते स्वतंत्र भारतात पूर्वीच चालू व्हायला हवे होते. ते वर्ष १९४७ मध्येच व्हायला हवे होते. जेव्हा लोकांनी अयोध्येचा उत्सव पाहिला, तेव्हा नंदी बाबा (ज्ञानवापीमधील नंदी व्यास तळघरातील पूजेविषयी) म्हणाले, ‘भाऊ, आपण का थांबावे ? वाट न पहाता रात्री बॅरिकेड तोडून घ्या.’ आता आपला कृष्ण कन्हैया (श्रीकृष्णजन्मभूमी) कुठे थांबणार आहे ?

‘कौरव’ संपणार !

योगी आदित्यनाथ म्हणाले की, परकीय आक्रमकांनी केवळ या देशातील संपत्तीच लुटली नाही, तर या देशाचा विश्‍वासही पायदळी तुडवला. स्वातंत्र्यानंतर ज्या आक्रमकांचा गौरव करण्याचे दुष्ट कृत्य केले गेले, ते केवळ मतांसाठी. ‘सुईच्या टोकाएवढीही भूमी देणार नाही’, असे दुर्योधनाने सांगितले होते, महाभारत घडायचे होते. त्यानंतर काय झाले ? कौरव संपले.