सुख म्हणजे नेमके काय ? हा प्रश्न अनादी काळापासून विचारला गेला आहे. याचा सविस्तर ऊहापोह भारतीय तत्त्वज्ञानात झाला आहे; मात्र सध्या प्रचलित असलेली सुखाची संकल्पना म्हणजे ‘खा, प्या, मजा करा’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, अशा स्वरूपाची आहे. ‘जगायचे आहे ते आजच जगून घ्या, उद्याची कुणाला शाश्वती नाही’, हा विचार रुजत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि अन्य सामाजिक माध्यमांवर कायम ‘ऑनलाईन’ रहाणार्या आजच्या तरुणाईचे लक्ष केवळ बाहेरच्या जगावर आहे.
(साभार : त्रैमासिक ‘सद्धर्म’, जुलै २०२३)