लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – बाबरी मशीद ‘शहीद’ करण्यात आली; मात्र ज्ञानवापी मशीद ‘शहीद’ होऊ देणार नाही; कारण बाबरीच्या संदर्भात जे झाले तसाच प्रकार आताही केला जात आहे. बाबरी आणि ज्ञानवापी यांच्यासह ३ सहस्र मशिदींची सूची बनवण्यात आली आहे, असा फुकाचा आरोप इत्तेहाद मिल्लत कौन्सिलचे प्रमुख मौलाना तौकीर रझा खान यांनी केला. ‘भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, न्यायालय आणि सरकार यांच्यावर विश्वासच राहिलेला नाही. देशातल्या मशिदींवर प्रतिदिन बुलडोझर चालवण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या देशातला कायदा अपकीर्त होत आहे’, असा दावाही खान यांनी केला. (देशाचा कायदा मुसलमानांच्या बाजूने असला, तर तो योग्य आणि नसला, तर अयोग्य, असा कांगावा रझा करत आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक)
सौजन्य : News18 Punjab/Haryana/Himachal
संपादकीय भूमिकाज्ञानवापीच्या ठिकाणी पूर्वी भव्य शिवमंदिर होते आणि ते पाडून तेथे मशीद बांधण्यात आली, हा इतिहास आहे आणि वर्तमानातही ते स्पष्ट झाले आहे. तरीही मुसलमान ज्ञानवापी हिंदूंना सोपवण्याऐवजी अशी भाषा करत असतील, तर त्यांना या देशात रहाण्याचा अधिकार नाही, असेच कुणीही म्हणेल ! |