चेन्नई येथे झालेल्या विशेष सत्संगाचे चित्र रेखाटणारी ५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. ऋग्वेदश्री जयकुमार (वय १४ वर्षे) !

चेन्नई येथील ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. ऋग्वेदश्री जयकुमार हिचा पौष कृष्ण दशमी (५.२.२०२४) या दिवशी १४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. ऋग्वेदश्री जयकुमार हिला १४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

कु. ऋग्वेदश्री जयकुमार

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे चेन्नईला आले होते. ‘चेन्नई येथील साधकांना त्यांच्या चैतन्याचा लाभ व्हावा’, यासाठी पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांच्या घरी एक सत्संग आयोजित करण्यात आला होता. चेन्नई येथील सर्व साधकांनी या विशेष सत्संगाचा लाभ घेतला. माझी मुलगी ऋग्वेदश्री हीसुद्धा या सत्संगाला उपस्थित होती. संपूर्ण सत्संगाच्या वेळी तिला आनंद जाणवत होता, तसेच तिला या सत्संगातून बरेच शिकायलाही मिळाले. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या कुटुंबियांना भेटून तिला पुष्कळ आनंद झाला. तिला झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी तिने सद्गुरु, संत आणि साधक यांचा जो सत्संग झाला, त्याचे एक चित्र रेखाटले.’

– सौ. सुगंधी जयकुमार (कु. ऋग्वेदश्रीची आई) (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४३ वर्षे), चेन्नई


परिपूर्णरित्या आणि समर्पित भावाने सेवा करणारी कु. ऋग्वेदश्री जयकुमार !

चेन्नई येथे झालेल्या विशेष सत्संगाचे चित्र रेखाटणारी ५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. ऋग्वेदश्री जयकुमार (वय १४ वर्षे) !

‘दळणवळण बंदीच्या कालावधीत चेन्नई येथील आम्ही काही साधकांनी ‘सनातन प्रभात’ या इंग्रजी भाषेतील मासिकाचे वाचन करण्याच्या सेवेला आरंभ केला. ‘प्रत्येक साधकाने ‘सनातन प्रभात’च्या एका पानाचे वाचन करून त्यावर चिंतन-मनन करून ते साधकांना भ्रमणभाषवर तमिळ भाषेत सांगायचे’, असे ठरवले गेले.

सौ. सुगंधी जयकुमार

पाक्षिक ‘सनातन प्रभात’ १२ पानांचे असल्यामुळे एकाच वेळी १२ ही साधक एकत्र येणे शक्य नव्हते. त्यामुळे असे ठरले की, प्रत्येक साधकाने त्याच्या पानाचे चिंतन ध्वनीमुद्रित करून एका साधकाने त्या सर्व ध्वनीमुद्रणांची एकच धारिका बनवून ती सर्वांना भ्रमणभाषवर पाठवायची. या सेवेत माझी मुलगी कु. ऋग्वेदश्री सहभागी असायची. ती आम्हा सर्व साधकांमध्ये वयाने लहान आहे; परंतु ‘ती स्पष्टपणे समजावून सांगते’, असे सर्व साधकांना वाटते. त्यासाठी ऋग्वेदश्री पुष्कळ अभ्यास करते. तिला येणार्‍या शंकांचे निरसन करून घेऊन विषय स्वतः नीट समजवून घेते. तो प्रत्यक्ष कागदावर उतरवते. विषय नीट समजून घेतल्यानंतरच ती सांगण्याचा प्रयत्न करते. तिच्या ध्वनीमुद्रणात एखाद्या विषयाचा अर्थ योग्य प्रकारे सांगितला गेला नसेल किंवा बोलतांना काही चुका झाल्या असतील, तर ती संपूर्ण पानाचा वृत्तांत पुन्हा ध्वनीमुद्रित करते. ती ही सेवा परिपूर्णरित्या आणि समर्पित भावाने करते. तिच्या सेवेत खंड पडू नये; म्हणून सेवा पूर्ण होईपर्यंत ती खोलीत कुणाला येऊ देत नाही. ‘ही सेवा करतांना मला पुष्कळ चांगले वाटते’, असे ती मला सांगते आणि ती ही सेवा आवडीने करते.

ऋग्वेदश्रीसारख्या बालसाधकांकडून आम्हाला शिकायला मिळत असल्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी मी कृतज्ञ आहे.’

– सौ. सुगंधी जयकुमार, चेन्नई, तमिळनाडू.