मालेगाव येथे शालेय विद्यार्थिनीची छेड काढणार्‍या धर्मांधाला अटक !

प्रतिकात्मक चित्र

मालेगाव – शहरातील रौनकाबाद भागातील शालेय विद्यार्थिनीला चॉकलेटचे आमीष दाखवून तिची छेड काढण्याचा प्रयत्न करणार्‍या संशयिताला पवारवाडी पोलिसांनी नागरिकांच्या साहाय्याने अटक केली. खलिल शेख शरीफ (वय ४७ वर्षे) असे त्याचे नाव असून त्याला १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

‘अटक केलेला संशयित मनोरुग्ण असून अल्पवयीन मुलीची छेडछाड करण्याची त्याची प्रवृत्ती आहे’, अशी माहिती पोलिसांना दिली. (मनोरुग्ण असल्याचे कारण देत सारवासारव करून त्याच्यातील वासनांधतेकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याने पुन्हा असे प्रकार करू नयेत, यादृष्टीने त्याला शिक्षा व्हायला हवी ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

वासनांधांपासून स्वतःला वाचवण्यासाठी विद्यार्थिनींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकायला हवे !