अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍या वासनांध नौशाद याला अटक !

पिंपरी-चिंचवड येथील निवासी शाळेतील प्रकार

नौशाद शेख

पिंपरी-चिंचवड – ‘क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमी’च्या धर्मांध नौशाद शेख याने एका अल्पवयीन मुलीवर २ वर्षे अत्याचार केले. या प्रकरणामध्ये त्याला साहाय्य करणारी माजी विद्यार्थिनी आणि शेख यांना अटक करण्यात आली. शेख याने १० वर्षांपूर्वीसुद्धा असाच गुन्हा केला होता. त्या वेळी त्याला अटक करण्यात आली होती. (अशा वासनांधांला पहिल्याच गुन्ह्याच्या वेळी कठोर शिक्षा केली असती, तर पुढील गुन्हे करण्यास धजावला नसता. – संपादक) पीडितेने रावेत पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

१. नौशाद शेख हा ‘क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमी’ या नावे निवासी शाळा चालवतो.

२. या शाळेत सध्या ७५ मुली आणि १०० हून अधिक मुले ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेतात.

३. शेख विरोधात ३० ऑक्टोबर २०१४ या दिवशी लैंगिक शोषण होत असल्याची अनेक विद्यार्थिंनीनी तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर शहरातील विविध महिला, तसेच सामाजिक संघटनांनी आवाज उठवून शेख याला अटक करण्याची मागणी केली होती. तेव्हा त्याला अटक झाली होती.

४. पीडिता ऑगस्ट २०२३ मध्ये घरी गेली. त्यानंतर तिने एका माजी विद्यार्थिनीस संपर्क केल्यावर तिनेही अत्याचार झाल्याचे सांगितले. पीडितेने आई-वडिलांना घडलेली घटना सांगितली. (अशा वासनांधांना शरीयतनुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून ठार मारण्याची किंवा हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर ते चुकीचे वाटू नये ! – संपादक)

पिंपरी-चिंचवडच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे म्हणाल्या, ‘‘हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. घटनेची व्याप्ती मोठी आहे. सर्व आजी-माजी विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन या घटनेचे सखोल अन्वेषण केले जाईल.’’

संपादकीय भूमिका

धर्मांधांचे हिंदूंवर अत्याचार करणारे विविध जिहाद समाप्त करण्यासाठी एकच उत्तर आहे – हिंदु राष्ट्र !