मुंबई – ‘केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा आहे. केंद्रीय अर्थसंकल्प हा शिस्त पाळणारा अर्थसंकल्प आहे’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ‘या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय, शेतकरी आणि युवा या सर्व घटकांकडे लक्ष देण्यात आले आहे. याचसमवेत नवीन कॉरिडॉर, रस्ते आणि पायाभूत सुविधा यांसाठी ११ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. शेतकर्यांच्या मालाला भाव मिळण्यासाठी मांडलेल्या योजनाही योग्य आहेत’, असे सांगून त्यांनी निर्मला सीतारामन् यांचेही अभिनंदन केले आहे.
सौजन्य टीव्ही 9 मराठी