khalistani Attack Retired Colonel : गुरुद्वारात खलिस्तानी आतंकवाद्याचे छायाचित्र लावण्यास विरोध करणार्‍या निवृत्त कर्नलच्या वाहनावर आक्रमण !

तरनतारन (पंजाब) येथील घटना

तरनतारन (पंजाब) – येथील पाहुविंद गावात दीप सिंह जन्मस्थान गुरुद्वारामध्ये २८ जानेवारी या दिवशी बाबा दीप सिंह यांच्या जयंतीनिमित्त एक उत्सव आयोजित करण्यात आला होता. या वेळी काही शीख तरुणांनी खलिस्तानी आतंकवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचे छायाचित्र लावले होते. या गुरुद्वाराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष (निवृत्त) कर्नल हरसिमरन सिंह यांनी यावर आक्षेप घेतला होता. त्यांनी या शीख तरुणांना भिंद्रनवाले याचे छायाचित्रे येथून हटवण्यास सांगितले. या तरुणांना हे मान्य नव्हते. छायाचित्र काढण्यावरून हरसिमरन सिंह आणि तरुण यांच्यामध्ये वादही झाला होता. यानंतर हरसिमरन त्यांनी स्वतः  छायाचित्र काढून टाकले. त्यानंतर हरसिमरन सिंह गुरुद्वारातून परतत असतांना त्यांच्या चारचाकी वाहनावर या शीख तरुणांनी आक्रमण केले. त्यांच्या गाडीची हानी केली. या वेळी सिंह यांचे संरक्षण करणार्‍या पोलिसांशीही या तरुणांची झटापट झाली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित होत आहे. यात एक पोलीस निरीक्षक घायाळ झाला. तसेच अन्य काही जण घायाळ झाले. पोलिसांनी सिंह यांना सुरक्षित स्थळी नेले आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच काही शीख नेतेही येथे पोचले आणि त्यांनी (निवृत्त) कर्नल हरसिमरन सिंह यांच्यावर शिखांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यास चालू केले.

संपादकीय भूमिका

पंजाबमधील खलिस्तानवाद्यांनाही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या इस्लामी देशांमध्ये हाकलून लावले, तर त्यांना भारताचे आणि हिंदूंचे महत्त्व लक्षात येईल !