Chhattisgarh Principal Arrested : ‘हिंदूंच्या देवतांवर विश्‍वास ठेवू नये’, अशी विद्यार्थ्यांना शपथ देणार्‍या मुख्याध्यापकाला अटक !

बिलासपूर (छत्तीसगड) येथील सरकारी शाळेतील घटना !

अटक करण्यात आलेले मुख्याध्यापक रतनलाल सरोवर

बिलासपूर (छत्तीसगड) – येथील मोहतराई गावातील सरकारी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रतनलाल सरोवर मुलांना ‘हिंदूंच्या देवतांवर विश्‍वास ठेवणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही’ अशी शपथ घ्यायला लावत होते. त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मुख्याध्यापक सरोवर यांना निलंबित केले. हिंदु संघटनांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापक सरोवर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आणि अटक केली. हिंदु संघटनांनी सरोवर यांचा पुतळा जाऊन निषेध केला होता.

प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक मुलांना ‘मी ब्रह्मा, विष्णु यांना देव मानणार नाही आणि त्यांची पूजा करणार नाही. हिंदु धर्मातील कोणत्याही देवतेवर विश्‍वास ठेवणार नाही’ अशी शपथ देत असल्याचे दिसत आहेत.

संपादकीय भूमिका

अशांना फाशीची शिक्षा करणारा कायदा केल्यावरच देशात हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांना वचक बसेल ! सरकारने असा कायदा करण्यासाठी हिंदूंनी दबाव निर्माण करणे आवश्यक !