Opposition Criticising Muizzu Government : मालदीवच्या विरोधी पक्षांकडून मुइज्जू सरकारवर टीका !

भारतासमवेतच्या संबंधांवरून व्यक्त केली चिंता !  

मालदीवचे राष्ट्रपती महंमद मोईज्जू व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

माले  (मालदीव) – मालदीवमधील विरोधी पक्षांनी राष्ट्रपती महंमद मुइज्जू सरकारवर टीका करत भारतासमवेतच्या संबंधांवरून चिंता व्यक्त केली आहे. विरोधी पक्षांनी भारताला मालदीवचा जुना सहकारी असल्याचे म्हटले आहे.

१. मालदीवियन डेमोक्रेटिक पार्टी आणि डेमोक्रेट्स या पक्षांनी त्यांच्या देशाच्या सरकारवर टीका करत भारताचे उघडपणे समर्थन केले आहे. भारत आणि मालदीव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून लक्षद्वीपच्या पर्यटनावरून तणाव निर्माण झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी भारताचे समर्थन केले आहे. दुसरीकडे चीनची हेरगिरी करणारी नौका मालदीवच्या बंदरावर येणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.

२. विरोधी पक्षांनी म्हटले आहे की, सध्याच्या सरकारचे परराष्ट्र धोरणातून वाटते की, सरकार भारतविरोधी वातावरण निर्माण करत आहे. हे देशाच्या विकासासाठी घातक आहे.