आसाम येथील खासदार बद्रुद्दीन अजमल यांचे विधान
(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)
करीमगंज (बिहार) – मुसलमान महिला डॉक्टर, आय.ए.एस्., आय.पी.एस्. अशा कोणत्याही मोठ्या पदावर असोत, तिला स्वतःचे केस झाकता येत नसतील किंवा तिने हिजाब घातला नाही, तर त्यांना मुसलमान कसे समजले जाईल ?, असे वक्तव्य खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी येथे आयोजित एका सभेत केला.
‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’ पक्षाचे खासदार अजमल यांनी पुढे म्हटले की, मुलींचे केस मोकळे सोडणे, हे सैतानाच्या हातील दोरीसारखे आहे. बाजारात जात असाल, समाजात वावरत असाल, तर तुम्ही हिजाब वापरलाच पाहिजे. तसेच मुलींची किंवा महिलांची दृष्टी झुकलेलीच पाहिजे.
संपादकीय भूमिका
|