देहलीच्या जामिया मिलिया इस्लामिया विश्‍वविद्यालयात ‘राम की कब्र खुदेगी, जामिया की धरती पर’ अशी घोषणाबाजी !

नवी देहली – येथील जामिया मिलिया इस्लामिया विश्‍वविद्यालयामध्ये २२ जानेवारीला ‘जस्टिस फॉर बाबरी’ ‘फाइट फॉर बाबरी’ आणि ‘बॉयकॉट फॉर बाबरी’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाला आहे. एका व्हिडिओमध्ये २ गटांमध्ये झटापट होत असल्याचेही दिसून आले. यात ‘राम की कब्र खुदेगी, जामिया की धरती पर’ अशा घोषणा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही विश्‍वविद्यालयातील घटना असल्याचे पोलीस उपायुक्त राजेश देव यांनी सांगितले. या घटनेमुळे विश्‍वविद्यालयाबोहर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सध्या येथे शांतता आहे.

संपादकीय भूमिका 

अयोध्येत श्रीराममंदिर उभे राहिले असले, तरी देशात रावणरूपी असुरांचा प्रभाव कायम आहे. अशांना ताळ्यावर आणण्यासाठी देशात हिंदु राष्ट्राची, रामराज्याची आवश्यकता आहे. यासाठी आता हिंदूंनी कटीबद्ध होणे आवश्यक आहे !