|
पनवेल – येथील रेल्वेस्थानकाच्या बाहेरील भागात भगवे झेंडे लावण्यास धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना मोठ्या प्रमाणात विरोध केला. त्याचा व्हिडिओ २१ जानेवारी या दिवशी सर्वत्र प्रसारित झाला. या वेळी धर्मांध मुसलमान ‘अल्ला हू अकबर’ (अल्ला महान आहे) आणि ‘नारा ए तकबीर’च्या (‘अल्लापेक्षा मोठे कुणी नाही’च्या) घोषणाही मोठमोठ्याने अन् त्वेषाने देत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्या वेळी तेथे उपस्थित असलेले पोलीस मात्र शिटी वाजवणे आणि त्यांच्याकडील काठीने जमावाला पांगवणे यापलीकडे काहीही करत नव्हते. या वेळी तेथे साधारण ७-८ पोलीस उपस्थित असल्याचे दिसते. या वेळी एका हिंदूला धर्मांधाने विनाकारण टपली मारल्याचा आणि एकाचा शर्ट ओढल्याचेही दिसून येत आहे.
यानंतर हिंदु धर्मीय पराग बालड यांच्यासह माजी नगरसेवक मुकीद काझी आणि पनवेल येथील जामा मशिदीशी संबंधित एक अशा तिघांनी मिळून एक व्हिडिओ प्रसारित केला. त्यात म्हटले आहे, ‘वरीलप्रकारे प्रसारित होणारा व्हिडिओ म्हणजे एक अफवा आहे. आम्ही पिढ्यान्पिढ्या एकत्र रहात आहोत. असा कोणताही प्रकार घडलेला नाही. जे चालू आहे, ते खोटे आहे. रिक्शावाल्यांचे भाड्यावरून भांडण झाले होते, तो प्रकार या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.’ (पहिल्या व्हिडिओमध्ये भगवे ध्वज लावण्यासाठी हिंदु तरुण आल्याचे आणि त्यांना विरोध होत असल्याचे स्पष्ट दिसत असतांना रिक्शावाल्यांचा तेथे संबंध जोडला जाणे ही सारवासारव असल्याचे कुणाला वाटले, तर चूक ते काय ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|

भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री