|
मुंबई – मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारकडून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य होण्याची शक्यता आहे. यामुळे ‘पाटील आंदोलन मागे घेतील आणि त्यांना मुंबई येथे येण्याची वेळ येणार नाही’, अशी चर्चा चालू आहे. सरकारचे शिष्टमंडळ याविषयी मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे.
मराठा आरक्षण आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी १५ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांची ४ घंटे बैठक झाली. या बैठकीत नातेवाइकांना आरक्षण देण्याविषयीचा एक समाधानकारक तोडगा त्यात काढला आहे, असे वृत्त आहे.
जरांगे यांच्या मागणीनुसार एखाद्याची कुणबी म्हणून नोंद आढळल्यास मराठा समाजातील त्याच्या नातेवाइकांनाही आरक्षण मिळण्याची शक्यता आहे.